नवी दिल्ली, 05 मे : रमजानच्या काळात मतदान प्रक्रिया पहाटे 5 वाजता सुरू करणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केलं. या काळात मतदान पहाटे 5 वाजता शक्य आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली होती. मात्र असं करणं हे सध्या शक्य नाही. त्यासाठी खूप मोठी तयारी करावी लागते असं आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे आता यापुढे सर्व टप्पे नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहेत.
सर्वोच्च न्यायलयामध्ये याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगला ही विचारणा केली आहे. याबाबत न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे केवळ विचारणा केली होती. त्याबाबत उत्तर मागितलं नाही. दरम्यान, याबाबतचा सर्व निर्णय हा निवडणूक आयोगाच्या हातात आहे.
EC rejects plea seeking rescheduling of the commencement of voting from 7 am to 4.30/5.00 am during the month of Ramzan. EC States "Commission does not find it feasible to alter the existing hours of poll for the 5th, 6th & 7th phase of general elections to the Lok Sabha, 2019." pic.twitter.com/grV4MfiJx8
— ANI (@ANI) May 5, 2019
त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केवळ रमजानच नाही तर वाढत्या गर्मीचा देखील विचार व्हावा असं म्हटलं आहे. रमजानच्या काळात 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी एमआयएमकडून देखील रमजानच्या काळात निवडणुका होऊ नयेत असं म्हटलं होतं.
काय म्हणाले अबु आझमी
सपाचे आमदार अबु आझमी यांनी रमजानच्या काळात मतदान करणं मुस्लिमांना कठीण आहे. रमजानच्या काळात मतदान कमी होईल. त्याचा फायदा हा भाजपला होणार असल्याचं आझमी यांनी म्हटलं आहे. लखनऊमधील मौलानांनी देखील रमजानच्या काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयच्या विचारण्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे. रमजानच्या काळात मुस्लिम बांधव उपवास करत असल्यानं त्याबाबत विचार व्हावं असं देखील काही मुस्लिम संघटना, मौलांना याचं म्हणणं आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर त्याबाबत चर्चा सुरू झाली होती. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहे.