लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात डिंपल यादव; या ठिकाणाहून भरला उमेदवारी अर्ज

डिंपल यादव यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 02:53 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात डिंपल यादव; या ठिकाणाहून भरला उमेदवारी अर्ज

लखनऊ, 06 एप्रिल : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली आहे. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी लागणार आहे. यावर्षी सपा आणि बसपानं एकत्र येत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण, काँग्रेसविरोधात रायबरेली आणि अमेठी येथे उमेदवार न देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. दरम्यान, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी कन्नोज या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, नेते रामगोपाल यादव, जया बच्चन आणि बसपाचे एस. सी. मिश्रा देखील हजर होते. यावेळी सपाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं.Loading...


मुलायम सिंग देखील मैदानात

मुलायम सिंग यादव हे मैनपूरी या मतदार संघातून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसनं सपा आणि बसपाविरोधात काही ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या रणनितीचा फायदा सपा आणि बसपाला होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.

बदायुमधून धमेंद्र यादव सपाच्या तिकीटावर लोकसभेच्या मैदानात उतरतील.सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव यांनी यापूर्वीच फिरोजाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे फिरोजाबादमध्ये अक्षय यादव विरूद्ध शिवपाल यादव अशी लढत होणार आहे.


आझमगड आणि मैनपूरीतून मुलायम विजयी

2014मध्ये मुलायम सिंग यादव यांनी आझमगड आणि मैनपुरीतून निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणाहून मुलायम सिंग विजयी झाले होते. दरम्यान, यापूर्वी मुलायम सिंग यादव यांनी 1996, 2004 आणि 2009मध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील मुलायम सिंग विजयी झाले होते. 2009मध्ये तब्बल 1.6 लाख मतांनी सपानं मैनपुरी लोकसभा जिंकली होती.


VIDEO: गुढीपाडव्यानिमित्त जेजुरी गडावर सदानंदाचा यळकोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2019 02:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...