नोटबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा - मनमोहन सिंग

नोटबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा - मनमोहन सिंग

'सबका साथ सबका विकास हा या सरकारचा मंत्र नाही तर लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हेच सरकारचं काम आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 05 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धाडसी पाऊल समजला जाणारा नोटबंदीचा निर्णय हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. मोदींच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था अतिशय वाईट स्थितीत पोहोचली असल्याची टीकाही त्यांनी केली. देशाला एका नव्या दमाच्या नेत्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीचा अतिशय धाडसी पाऊल असा उल्लेख करतात. या निर्णयामुळे काळ्यापैशाला आळा बसला असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतो. मात्र विख्यात अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय त्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजुनही सावरेली नाही.

देशाची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहे. लोकांना बदल हवा आहे. सबका साथ सबका विकास हा या सरकारचा मंत्र नाही तर लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हेच सरकारचं काम आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.  या आधी राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर नोटबंदीवरून जोरदार टीका केली होती.

राहुल गांधी यांची मोदींवर टीका

"तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी,' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्रमक टीका केली असताना राहुल यांनी मात्र प्रेम आणि मिठी याने उत्तर दिलं आहे.

First published: May 5, 2019, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading