या मुख्यमंत्री वयाच्या 81व्या वर्षी का आहेत काँग्रेसच्या खास; दिल्लीतून लोकसभेच्या मैदानात

या मुख्यमंत्री वयाच्या 81व्या वर्षी का आहेत काँग्रेसच्या खास; दिल्लीतून लोकसभेच्या मैदानात

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित या देखील आता लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : भाजपनं रविवारी दिल्लीतील चार उमेदवारींची घोषमा केली. यावेळी चांदनी चौकातून डॉ. हर्षवर्धन, नॉर्थ इस्ट दिल्लीतून मनोज तिवारी, वेस्ट दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि साऊथ दिल्लीतून रमेश बिधूडींना भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवाय, पंजाबमधील अमृतसर आणि उत्तर प्रदेशातील घोसीमधून देखील उमेदवारांची भाजपनं केली आहे.

त्यानंतर आता काँग्रेसनं देखील आपले उमेदवार जाहीर केली असून 81 वर्षाच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित देखील लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना नॉर्थ इस्ट दिल्लीतून मनोज तिवारी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोथिया आणि पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


राहुल गांधींच्या अमेठीतील उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक आयोगाने दिला निर्णय


शिला दिक्षित यांच्याबद्दल

शिला दिक्षित यांनी 3 वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पंजाबच्या कपूरथला येथे जन्मलेल्या शिला दिक्षित याचं शिक्षण जीजस अॅड्ण मेरी स्कुलमधून झालं. मिरांडा विश्वविद्यालयातून त्यांनी कॉलेज पूर्ण केलं. लग्नापूर्वी त्यांचं आडनाव कपूर होतं. त्यानंतर त्यांनी स्वातंत्रसेनानी उमाशंकर दिक्षित यांचा मुलगा विनोद कुमार दिक्षित यांच्याशी लग्न केलं. ज्यावेळी 1969मध्ये इंदिरा गांधी यांना काँग्रेसमधून काढून टाकलं गेलं तेव्हा उमाशंकर दिक्षित यांनी इंदिरा गांधी यांना साथ दिली. त्यानंतर 1974मध्ये उमाशंकर दिक्षित यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिला दिक्षित कनोजमधून खासदार म्हणून विजयी झाल्या. शिला दिक्षित या गांधी घराण्याच्या जवळच्या म्हणून परिचित आहेत. काँग्रेसमधील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शिला दिक्षित देखील सहभागी असतात. दरम्यान, शिला दिक्षित यांनी 3 वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

2014मध्ये झालेल्या परभवानंतर शिला दिक्षित यांनी राज्यपालपद सोडून दिल्लीला येणे पसंत केलं. त्यानंतर दिल्लीचं मैदान मारण्यासाठी आता काँग्रेसनं शिला दिक्षित यांना देखील लोकसभेच्या मैदानात उरवलं आहे.


'चौकीदार चोर हैं'वरून केलेल्या वक्तव्याबाबत राहुल गांधींची दिलगिरी


आप - काँग्रेसची बोलणी फिस्कटली

दरम्यान, दिल्लीमध्ये आप - काँग्रेस भाजपविरोधात आघाडी करणार अशी चर्चा होती. पण, काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळं आप - काँग्रेस होऊ शकली नाही.


मनोज तिवारी यांचा जोरदार प्रचार

दरम्यान, भाजप उमेदवारा मनोज तिवारी यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी सपना चौधरी देखील हजर होती.
VIDEO: हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञांवर खोटे आरोप: अमित शहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 02:08 PM IST

ताज्या बातम्या