'भाजप नेत्याची जीभ कापा; 10 लाखाचं बक्षीस मिळवा'

'भाजप नेत्याची जीभ कापा; 10 लाखाचं बक्षीस मिळवा'

वाचाळवीरांच्या यादीत आता काँग्रेसच्या नेत्याची देखील भर पडली आहे.

  • Share this:

शिमला, अमित शर्मा, 16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत वाचाळवीरांची संख्या आता वाढताना दिसत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगानं काही नेत्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर अद्याप कुणी शहाणे झाले असं दिसत नाही. या वाचाळवीरांच्या यादीत आणखी एका नेत्याची भर पडली आहे. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारमधील माजी अ‍ॅडव्होकेट जनरल विनय शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील भाजपचे अध्यक्ष सतपाल सत्ती यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षिस दिलं जाईल असं विधान विनय शर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप युवा मोर्चानं पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सतपाल सत्ता यांनी केलेल्या विधानाचा शर्मा यांना राग आला. त्यानंतर त्यांनी सतपाल सत्ता यांची जीभ कापा म्हणत 10 लाखांचं बक्षिस देखील जाहीर केलं.

स्मृती इराणी यांच्याविरुद्ध पुण्यात खटला, दिली ही खोटी माहिती

काय बोलले होते सत्ती

दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील भाजपचे अध्यक्ष सतपाल सत्ती यांनी राहुल गांधींविरोधात फेसबुकवर लिखाण केलं होतं. यावेळी त्यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह टिप्पमी केली होती.  शनिवारी हे सारं प्रकरण समोर आलं होतं. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकीदार चोर है म्हणत लक्ष्य केलं होतं. त्याच आधारे राहुल गाधींविरोधात सत्ती यांनी लिखाण केलं होतं. रॅली दरम्यान सतपाल सत्ती यांनी फेसबुकवरील ही पोस्ट वाचून देखील दाखवली होती. त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर विनय शर्मा यांनी पोलीस ठाण्यात जात सतपाल सत्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. पण, शर्मा यांच्या जीप कापण्याच्या विधानानंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे.

VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस

First published: April 16, 2019, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading