मतमोजणीच्या दिवशी घडवला जाऊ शकतो हिंसाचार, केंद्राचे सतर्कतेचे आदेश

'निकाल मनाविरुद्ध लागले तर काही लोक सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सतर्क राहा'

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 09:14 PM IST

मतमोजणीच्या दिवशी घडवला जाऊ शकतो हिंसाचार, केंद्राचे सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली 22 मे : लोकसभेच्या सात टप्प्यात झालेल्या मतदानाची गुरुवारी 23 मे रोजी मतमोजणी आहे. या दरम्यान देशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडू शकतात अशी भिती केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लहिलं असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणुकांचे सर्व्हे जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. EVMमध्ये फेरफार करण्याची शक्यताही व्यक्त केली गेली. तर अनेक पक्षांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. स्ट्रॉंगरुमच्या बाहेर कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं असं आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं.

बिहारच्या काही नेत्यांनी तर निकाल आपल्या बाजूने लागले नाहीत तर सशस्त्र संघर्ष करण्याचा इशाराच दिला. एका उमेदवाराने पत्रकार परिषदेतच बंदूक उंचावली. त्यामुळे वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जातंय. निवडणुकीच्या सातही टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला होता.

या सर्व घटना लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने सतर्कतेचे आदेश राज्यांना दिले आहे. ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवा अशा सूचनाही गृहमंत्रालयाने केल्या आहेत.बिहारमध्ये सशस्त्र संघर्षाची धमकी

रविवारी संपलेल्या मतदानानंतर 'एक्झिट पोल' जाहीर झाले आणि विरोधी पक्षांची झोपच उडाली. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं मंगळवारी केलं होतं. त्यानंतर आज एका अपक्ष उमेदवाराने पत्रकार परिषदेतच बंदूक दाखवून संघर्षासाठी तयार असल्याचं सांगितलं.

राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सशस्त्र संघर्षाचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भभुआ चे माजी आमदार आणि बक्सर मधून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले रामचंद्र यादव हे आज बंदूक घेऊनच पत्रकार परिषदेत आले. लोकशाहीच्या रक्षणासाठी बंदुकीचा वापर करायला तयार असल्याचं ते म्हणाले. महाआघाडीच्या नेत्यांनी फक्त आदेश द्यायला उशीर आहे असंही त्यांनी सांगितलं.

यावर बिहारमध्ये जोरदार राजकारण सुरू झालंय. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने यावर टीका केलीय. आम्ही संघर्षासाठी तयार आहोत असंही त्यांनी सांगितंल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...