S M L

VIDEO...तर मोदी विजय चौकात फाशी घेतील काय? खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी विजय चौकात फाशी घेतील का असा प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 08:49 PM IST

VIDEO...तर मोदी विजय चौकात फाशी घेतील काय? खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली 13 मे : लोकसभेच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या असताना नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य काही कमी होण्याची चिन्ह नाहीत. सॅम पित्रोदांचं  वक्तव्य ताजं असतानाच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी विजय चौकात फाशी घेतील का असा प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 40 पेक्षा कमी जागा मिळतील असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना केलं होतं. त्याला उत्तर देताना खर्गे म्हणाले काँग्रेसला 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते दिल्लीतल्या विजय चौकात फाशी घेतील का? खर्गेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय.Loading...

काँग्रेसचे अनेक नेते नरेंद्र मोदींबाबत अशाच प्रकारची वक्तव्य करत असल्याचा आरोप भाजपने केलाय. काँग्रेसची हीच संस्कृती असल्याचंही ते म्हणाले. या आधी नवज्योतसिंग सिद्धू यांनीही अशाच प्रकारचं विधान केलं होतं. लोकांनी असा छक्का मारावा की मोदीचा हिंदूस्थानच्या बाहेर जाऊन मृत्यू झाला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे लोकसभेतले नेते आहे. खर्गे सारख्या ज्येष्ठ नेत्याने असं विधान केल्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.'राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे'

राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य काँग्रेसच्या चांगलच अंगलट आलंय. शेवटच्या टप्प्यात पंजाबमधल्या काही जागांवर निवडणूक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. 1984च्या दंगली प्रकरणी सॅम पित्रोदा यांना नाही तर राहुल गांधी यांना लाज वाटली पाहिजे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय.पंजाबमधल्या भटिंडा इथं झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली. पंतप्रधान म्हणाले. राहुल आपल्या गुरूवर रागावण्याचं फक्त नाटक करत आहेत. यांच्या मनात कायम शीख समाजाविषयी रागाचीच भावना आहे. त्यामुळे उगाच पांघरून घालण्याचं काम करू नका असंही त्यांनी काँग्रेसला सुनावलं.काँग्रेस दंगलखोरांना वाचवतेय

पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसने 1984 च्या दंगलीला जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी यासाठी काहीही केलं नाही. त्यात ज्यांच्यावर आरोप होते त्या कमलनाथ यांना मध्यप्रदेशचं मुख्यमंत्री केलं असा आरोप त्यांनी केला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने टीका होत असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सॅम पित्रोदा यांच्यावर कोरडे ओढले होते. पित्रोदा जे म्हणाले त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी देशाची माफी मागावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2019 08:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close