सर्वच पक्षात 'वाचाळवीरां'चा भरणा, नेते एकाच माळेचे मणी

सर्वच पक्षात 'वाचाळवीरां'चा भरणा, नेते एकाच माळेचे मणी

'निवडणुकीच्या काळात वातावरण तापलेलं असलं तरी सर्व पक्षांच्या नेत्यांनी किमान सभ्यतेचं पालन केलंच पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली 16 एप्रिल : समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूरचे उमेदवार आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेलं वादळ शांत होण्याची चिन्हे नाहीत.  खान यांचा मुलगा अब्दुला याने आज केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय. आझम खान हे मुस्लिम असल्यानेच निवडणूक आयोगाने कारवाई केली असं वक्तव्य अब्दुला यांनी केलं होतं. भाजपला खूष करण्यासाठीच ही कारवाई केली गेली असंही ते म्हणाले. 'न्यूज18 इंडिया'च्या 'सुलगते सवाल' या कार्यक्रमात बोलताना सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी एकमेकांची उणीदुणी काढत हल्लाबोल केला.

एकाच माळेचे मणी

सर्वच पक्षात वाचाळवीरांचा भरणा आहे. सर्वच नेते एकाच माळेचे मणी असल्याचा सूर या चर्चेतून निघाला. तर राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपलं चुकलं असं कबूल करण्याऐवजी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानली. काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुस्लिमांनी मतदान करावं असं आवाहन केलं होतं. त्यावरही भाजपने टीका केली. त्यामुळे सर्वच प्रवक्त्यांनी एकमेकांचे वाभाडे काढत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सपा आझम खान यांच्या पाठिशी

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनशाम तिवारी म्हणाले, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. योगी आदित्यनाथ, राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन वेळा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. भाजपनेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे सगळ्यात जास्त वेळा उल्लंघन केलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार आहे.

तर कारवाई करा

आचार्य प्रमोद म्हणाले की, हिमाचल प्रदेश भाजपच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांना आईवरून शिवी दिली भाजपला एवढीच चाड असेल तर त्यांना निलंबित केलं का केलं नाही असा सवाल त्यांनी केला. हा नेत्यांच्या वागणुकीचा प्रश्न नाही तर संस्कार आणि आदर्शांचा प्रश्न आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर कोरडे ओढले. भाजप संस्कृतीच्या गप्पा मारते मात्र आचरण संस्कृतीच्या विरुद्ध आहे अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसने भाजपला शब्दकोषातल्या सर्व शिव्या घातल्या त्यांची जात काढली, त्यांच्या आईंचा उल्लेख केला, शिक्षण काढलं, पात्रता काढली त्यांमुळे काँग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही असं मत भाजपच्या प्रवक्त्या  नुपूर शर्मा यांनी व्यक्त केलं.

First published: April 16, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading