• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'राजकारणात महिला 'सॉफ्ट टार्गेट','वाचाळवीरां'ची तोंडं बंद करा'

'राजकारणात महिला 'सॉफ्ट टार्गेट','वाचाळवीरां'ची तोंडं बंद करा'

'वाचाळवीरांना लोकांना लोकांनी झिडकरावं, पोलिसांनी कारवाई करावी किंवा निवडणूक आयोगाने बंदी घालावी.'

 • Share this:
  मुंबई 15 एप्रिल : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपच्या नेत्या जयाप्रदा यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभर वादळ निर्माण झालंय. सर्वच राजकीय पक्षांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय. या विषयावर आधारीत होता  'न्यूज18 लोकमत'चा आजचा 'बेधडक' हा कार्यक्रम. राजकारणात महिला नेत्या या 'सॉफ्ट टार्गेट' असतात. राजकारणातही पुरुषांचं वर्चस्व असल्यानेच हे होतं. राजकारणातल्या पुरुषांकडून यात काही होईल अशी अपेक्षा नाही असं परखड मत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी व्यक्त केलं. अशा वाचाळवीरांची तोंड बंद करण्यासाठी निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. या कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे प्रवक्ते अयुब शेकासन, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, दैनिक तरुण भारतचे संपादक सुनील कुहीकर, राजकीय विश्लेषक प्रकाश पवार, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमंत टकले सहभागी झाले होते. माफी मागणार का? समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अयुब शेकासन यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चर्चेत सहभागी झालेल्या सर्वच प्रवक्त्यांनी शेकासन यांनी पक्षाच्या वतीने माफी मागावी अशी मागणी केली मात्र शेकासन यांनी माफी मागितली नाही. पक्ष आझम खान यांच्यावर कारवाई करेल असं ते म्हणाले. आझम खान यांनी कुठल्या संर्भात वक्तव्य दिलं ते तपासलं पाहिजे. आझम खान हे मोठे नेते आहेत. खान यांनी हे विधान अमरसिंह यांच्या संदर्भात केलं होतं असंही ते म्हणाले. राजकारणातही पुरुषी वर्चस्व काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी अतिशय परखड भूमिका मांडत वाचाळवीरांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, ''अशा लोकांना लोकांनी झिडकरावं, पोलिसांनी कारवाई करावी किंवा निवडणूक आयोगाने बंदी घालावी. राजकारणात अजुनही पुरुषी वर्चस्व आहे हे मान्य केलं पाहिजे. सोनिया आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह बोललं गेलं. सोनिया गांधी यांची तुलनी मोनिका लेविंस्की यांच्याशी केली गेली होती. अशा वक्तव्य करणाऱ्या लोकांना निवडणुकीपासून दूर ठेवलं पाहिजे.'' हलक्या दर्जाची चर्चा हे दुर्दैव राजकीय क्षेत्रात असलेल्या महिलांबाबत अतिशय हलक्या दर्जाची चर्चा होते हे दुर्दैवी आहे. लोकांनीही अशा चर्चेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबात चुकीचं विधान केलं होतं. पण अजुनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही असा सवाल त्यांनी भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांना केला. त्यावर मधू चव्हाण म्हणाले की कदम यांना पक्षाने शिक्षा केली होती आणि त्यांना समजली दिली होती. भाजपमध्येही वाचाळवीर भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण म्हणाले, राजकारणाचा दर्जा घसरला आहे. आता त्याचा लोकांनाही वीट आलाय. हे थांबलं नाही तर लोकांमध्ये अतिशय घृणा निर्माण होईल. भाजपमध्येही काही वाचाळवीर आहेत हे मी कबूल करतो आणि आम्ही अशा लोकांना त्या त्या वेळी समजही देत असतो. भाजपच्या एका बैठकीत इंदिरा गांधींचा एका नेत्याने त्यांचा ऐकेरी उल्लेख केला होता तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना रोखलं होतं. हा विषय राजकारण आणि पक्षविरहीत असावा असंही ते म्हणाले. ...तर परिस्थिती हाताबाहेर जाईल राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमंत टकले यांनीही कठोर भूमिका मांडली. ते म्हणाले, काही नेत्यांना लोक दिसले की चेव चढतो. खुमखुमी येते. अशा वाचाळवीरांना सर्वच पक्षांनी रोखलं पाहिजे अशा लोकांची लाज वाटायला पाहिजे. अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. सोशल मीडियावरही अनेक चुकीच्या गोष्टी टाकल्या जात आहेत. अशाच गोष्टी होत राहिल्या तर अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. पक्षाच्या नाही तर लोकांच्या मागे राहा दैनिक तरुण भारतचे संपादक सुनील कुहीकर म्हणाल राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाच्या हा परिणाम आहे. खालच्या पातळीला गेलं की मतं मिळतात असं या नेत्यांना वाटतं की काय असा प्रश्न निर्माण होतो. आपले लोक चांगल्या पक्षांच्या मागे उभे राहतात त्या पेक्षा लोकांनी चांगल्या व्यक्तिंच्या मागे उभे राहिलं असतं तर परिस्थिती सुधारली असती. लोकांनीच अद्दल घडवावी अभ्यासक प्रकाश पवार म्हणाले, राजकारणाचा स्तर घसरला आहे हे खरं असलं तरी त्यांना निवडूण देणाऱ्या नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे. जी व्यक्ती पक्ष चालवते त्या नेत्यानेच आदर्श घालून दिला पाहिजे. एकदा साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांनी महिला नेत्याविषयी केलेल्या विधानाबद्दल जाब विचारला होता. निवडणूक आयोग किंवा इतरांनी कारवाई करण्याआधी पक्षानेच अशा लोकांना अद्दल घडवली पाहिजे.
  First published: