• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • शत्रुघ्न सिन्हा खोटं नाणं; काँग्रेस कार्यकर्त्यांचा शॉट 'गन'वर निशाणा

शत्रुघ्न सिन्हा खोटं नाणं; काँग्रेस कार्यकर्त्यांचा शॉट 'गन'वर निशाणा

शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर खोटं नाणं अशी टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

 • Share this:
  पाटना, 21 एप्रिल : भाजपनं शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यानंतर नाराज शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसचा हात धरला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा पाटणामधून लोकसभेची निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्बत देखील झालं. पण, शुत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. रविवारी ( आज ) शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या पाटणामधील कार्यालयामध्ये पोहोचले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी दिसून आली. शिवाय, खोटं नाणं अशी टीका देखील यावेळी केली गेली. तसेच विरोधात नारेबाजी देखील केली गेली. तर, काही कार्यकर्त्यांनी पाच वर्षापासून होता कुठं? असा सवाल केला. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर भारताची शस्त्र काय दिवाळीसाठी आहेत का? - मोदी पक्ष स्थापनेच्या दिवशीच भाजपचा 'शत्रू' काँग्रेसमध्ये दरम्यान, भाजपच्या स्थापना दिनीच म्हणजेच 6 मार्च रोजी भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी भाजपवर टिका देखील केली होती. भाजपामध्ये हळूहळू हुकूमशाही येत आहे. पण, मी केवळ सतत सत्याचीच बाजू धरली. मी कायम शेतकरी, तरूण आणि बेरोजगारीबद्दल बोललो. जेव्हा नोटाबंदी विरोधात बोललो तेव्हा मला देशद्रोही ठरवलं गेल्याची टिका शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी केली होती. भाजपला आपल्या विरोधकांमध्ये केवळ शत्रुच दिसतो अशी टिका देखील यावेळी त्यांनी केली होती. सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी प्रवक्ते रणदिपसिंह सुरजेवाला आणि शक्ति सिंह गोहिल यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची बिहारमध्ये ताकद वाढली अशी प्रतिक्रिया देखील यावेळी गोहिल यांनी दिली होती. पाटणामध्ये शत्रुघ्न सिंन्हा विरूद्ध रवि शंकर प्रसाद असा सामना रंगला आहे. वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्यानं सिन्हा यांच्यावर भाजप नेतृत्व नारज होतं. त्यामुळे त्यांना पाटनामधून तिकीट नाकारलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा
  First published: