VIDEO भाजपचा आरोप खोटा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ, राहुल गांधींनी सादर केले पुरावे

VIDEO भाजपचा आरोप खोटा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ, राहुल गांधींनी सादर केले पुरावे

राहुल गांधी यांनी भाजपला उत्तर देण्यासाठी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादीच वाचून दाखवली. त्यात शिवराजसिंह चौहानांच्या नातेवाईकांचा समावेश होता.

  • Share this:

भोपाळ 14 मे : मध्य प्रदेशात सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच कर्ज माफ करण्याता निर्णय घेतला. मात्र सरकारने कर्ज माफच केला नाही असा आरोप भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असाच आरोप केला होता. त्याला राहुल गांधी यांनी आज जाहीर सभेतच उत्तर दिलं. चौहान यांच्या नातेवाईकांचं कर्ज माफ झाल्याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन काँग्रेसने दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर त्यांनी निर्णयही घेतला. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे भाजपने तो मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरला. आश्वासन देऊनही काँग्रेसने ते आश्वासन पाळलं नाही असाही आरोप भाजपने केला आहे.

मध्य प्रदेशात झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी भाजपचे आरोप फेटाळले आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांनाच यादी वाचून दाखवायला सांगितलं. या यादीत माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नातेवाईकांची असलेली दोन नावे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वाचून दाखवली. यात शिवराजसिंह यांचे भाऊ आणि निरंजन सिंग हे भाचे यांचा समावेश असल्याचं कमलनाथ यांनी सांगितलं. आम्ही खोटं आश्वासन देत नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

सत्तेत आल्यानंतर 10 दिवसांच्या आता कर्जमाफी करू असं आश्वासन काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिलं होतं. तर लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे.

पाऊस लांबणार?

यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यंदा 93 टक्की पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटनं म्हटलं आहे. 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती स्कायमेटचे शास्त्र्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी दिली आहे.

सुशांत पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल अशी माहितीही त्यांनी दिली.

First published: May 14, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading