VIDEO 'प्रेमाच्या आडून शिव्यांचा मार, काँग्रेसचं हे धोरण चालणार नाही'

VIDEO 'प्रेमाच्या आडून शिव्यांचा मार, काँग्रेसचं हे धोरण चालणार नाही'

मतदानाचे शेवटचे दोन टप्पे राहिल्याने सर्वच नेत्यांनी आपले हल्ले तीव्र केले आहेत. शिव्यांचा यथेच्छ वापर होतोय.

  • Share this:

नवी दिल्ली 08 मे : निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची सध्या राळ उठलीय. मतदानाचे शेवटचे दोन टप्पे राहिल्याने सर्वच नेत्यांनी आपले हल्ले तीव्र केले आहेत. शिव्यांचा यथेच्छ वापर होतोय. काँग्रेस कितीही साळसुदपणाचा आव आणत असला तरी प्रेमाच्या आडून शिव्यांचा वापर आता चालणार नाही असा पलटवार भाजपने केलाय.पंतप्रधानांच्या टीकेचं राजकीय भांडवलं करणारी काँग्रेस गेली 18 वर्ष पंतप्रधान मोदींना शिव्यांची लाखोळी वाहत आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केलीय. दररोज मिळणाऱ्या शिव्यांमुळेच मला उर्जा मिळते असं पंतप्रधांनी सांगितलं होतं अशी आठवणही त्यांनी करून दिली.तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मर्यादा सोडली असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधनांनी आपल्या वक्तव्यांनी पंतप्रधानपदाची मर्यादा घालवली असा आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या एका प्रचारसभेत बोफोर्सच्या मुद्यावरून राजीव गांधी यांना टार्गेट केलं होतं. त्यानंतर वातावरण अधिक तापलं.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून आक्रमक झाले आहेत. चौकिदार चोर है ही त्यांची घोषणा चांगलीच गाजली. ट्विटरवरूनही त्यांनी मोदींना अहंकारी, मानसिक रोगी, हिटलर अशी अनेक विशेषणं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लावली होती. डिक्शनरीतल्या सर्व शिव्यांची लाखोळी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वाहिली असा आरोपही भाजपने केलाय.प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका

नरेंद्र मोदी हे दिल्लीला फक्त पाच वर्षांपूर्वी आले पण माझा जन्मच दिल्लीत झाला आहे आणि गेली 47 वर्षं मी दिल्लीतच राहते आहे, असं प्रियांका गांधींनी दिल्लीतल्या प्रचारात मोदींना उद्देशून म्हटलं आहे. मोदींच्या खोट्या आश्वासनांमुळे दिल्लीकर वैतागले आहेत. म्हणूनच मी दिल्लीची मुलगी या नात्याने मोदींना आव्हान करते की त्यांनी नोटबंदी, GST आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर शेवटच्या दोन टप्प्यांतली निवडणूक लढवून दाखवावी, असं त्या म्हणाल्या.दिल्ली के दिल की बात

मला 'दिल्ली के दिल की बात' म्हणजेच दिल्लीच्या लोकांच्या मनातली गोष्ट माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आणि नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं.

याआधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी राजीव गांधींच्या नावावर मतं मागून दाखवावी, असं आव्हान मोदींनी केलं होतं. त्याला प्रियांका गांधींनी त्याच शब्दात उत्तर दिलं आहे.आक्रमक प्रचार

प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यांमध्ये आक्रमक प्रचार करत आहेत. हरियाणामधल्या सभेमध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख दुर्योधन असा केला आणि एक कविताही वाचून दाखवली. बेरोजगारी, नोटबंदी या मुद्दयांवरून प्रियांकांनी मोदींना चांगलंच लक्ष्य केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:21 PM IST

ताज्या बातम्या