काँग्रेस समर्थकाने केली साध्वी प्रज्ञा आणि हाफिज सईदची तुलना, नव्या वादाची ठिणगी

काँग्रेस समर्थकाने केली साध्वी प्रज्ञा आणि हाफिज सईदची तुलना, नव्या वादाची ठिणगी

'साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा खटला कमकूवत व्हावा असा गृहमंत्रालयानेच प्रयत्न केला होता. काही वकिलांनीही कोर्टात ते सांगितलंही होतं.'

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल :  भाजपने साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्याने राजकीय वादाला सुरुवात झालीय. साध्वी प्रज्ञा आणि हाफिज सईद हे एक सारखेच आहे. पाकिस्तानी नागरिकांनी हाफिज सईदला नाकारलं तसच साध्वी प्रज्ञा यांनाही नाकारतील असं मत काँग्रेसचे समर्थक तेहसीन पुनावाला यांनी व्यक्त केलं. CNNnews18 च्या FaceOff या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. या वक्तव्याने नव्या राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दिली उमेदवारी

साध्वी प्रज्ञा यांना भाजपने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांच्या विरोधात उमेदवारी दिलीय. हिंदू दहशतवाद हा शब्द जन्माला घालणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याविरोधात ही उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली. या विषयावर FaceOff मध्ये वादळी चर्चा झाली. पत्रकार रशीद किडवई, काँग्रेसचे समर्थक तेहसीन पुनावाला, भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली हे सहभागी झाले होते.

राजकीय षडयंत्र

साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधात न्यायालयात काहीही सिद्ध झालेलं नाही. त्यांच्याविरुद्धचे सर्व आरोप हे राजकीय होते. त्यामुळे त्यात काहीही तथ्य आढळले नाही. राहुल गांधी यांच्याविरुद्धही आयकर विभागाची चौकशी सुरु आहे आणि तेही निवडणूक लढवत आहेत असा युक्तिवाद भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी केला.

तर काँग्रेसचे समर्थक तेहसीन पुनावाला म्हणाले, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा खटला कमकूवत व्हावा असा गृहमंत्रालयानेच प्रयत्न केला होता. काही वकिलांनीही कोर्टात ते सांगितलंही होतं.  त्यामुळे साध्वी विरुद्ध खटलाच उभा राहू शकला नाही.

काँग्रेसचं सॉफ्ट हिंदुत्व?

साध्वी प्रज्ञा यांना शिवराजसिंह चव्हाण यांच्या सरकारनेच दोन वेळा अटक केली होती. आता मात्र ते साध्वी यांच्यासोबत दिसत आहेत. त्यांच्या विरुद्धचे आरोप अतिशय गंभीर आहेत त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी त्याची काळजी घेतली पाहिजे असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक रशीद किडवई यांनी व्यक्त केलं.

साध्वी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर दिग्विजयसिंग यांनी त्यांचं स्वागत करणारं ट्विट करून अतिशय सौम्य भाषा वापरली याची आठवण जेव्हा पुनावाला यांना करून देण्यात आली तेव्हा त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही. भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचं हे सॉफ्ट हिंदुत्व आहे का? असाही प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

VIDEO : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 09:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading