Exclusive: नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा आहे काँग्रेसचा 'मास्टर प्लान'

Exclusive: नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा आहे काँग्रेसचा 'मास्टर प्लान'

नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता थेट सोनिया गांधी यांनीच आघाडी सांभाळण्यासाठी पुढे आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 17 मे : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान 19 मेला होत आहे. 23 मेला मतमोजणी असून दुपारपर्यंत मोदींच पंतप्रधानपदावर राहणार की सत्तापरिवर्तन होणार हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत 2014 सारखं वातावरण नाही. भाजप आणि मित्रपक्षांना बहुमत मिळणार नाही असं काँग्रेस आणि विविध पक्षांना वाटतं. त्यामुळे काँग्रेसने आपल्या सगळ्या दिग्गज नेत्यांना कामाला लावलं असून काँग्रेसचा 'मास्टर प्लान' तयार होतोय.

या निवडणुकीत भाजपला 100 जागांचा फटका बसेल असा अंदाज काँग्रेसला आहे. त्याचा फायदा  पक्षांना होईल आणि तेच किंग मेकर होतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय. तर 44 वरून काँग्रेसच्या जागांची संख्या 100 च्या जवळपास असेल असं पक्षात्या जाणकार नेत्यांना वाटतंय. काँग्रेसने एकदा 100 चा आकडा पार केला की सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल असंही या नेत्यांचा अंदाज आहे.

त्या दृष्टीने रणनीती तयार करण्यात आली असून थेट सोनिया गांधीच आपल्या जुन्या विश्वासू सहकाऱ्यांसह आघाडी सांभाळण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली असून पहिला टप्प्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही पक्षांना संकोच वाटू नये यासाठी सोनियांनीच आघाडी सांभाळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातेय.

सोनिया गांधी सक्रिय

लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालांनी वेग आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

या दिग्गज नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी

अहमद पटेल - सगळ्या राजकीय हालचालींवर नजर ठेवून पुढची रणनीती तयार करणं आणि त्या सगळ्या घडामोडींचा अहवाल सोनिया गांधी यांना पोहोचवणं. सत्ता स्थापनेसाठी सर्व पूर्व तयारी करणं

अशोक गहलोत - यांचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांशीही अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे छोट्या प्रादेशीक पक्षांशी संवाद साधण्याचं काम राजस्थानचे मुख्यमंत्री असलेल्या गहलोत यांना देण्यात आलंय.

कमलनाथ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम संबंध आहेत. त्यामुळे रसदपुरवढ्यासाठी सज्ज राहा असं त्यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि आंध्रचे नेते जगन रेड्डी यांच्याशी चर्चेची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर देण्यात आली आहे.

First published: May 17, 2019, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading