सांगण्यासारखं काही नसल्यानेच नरेंद्र मोदींनी केला जातीचा उल्लेख - काँग्रेसचा आरोप

'शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू केलं. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाही.'

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 05:52 PM IST

सांगण्यासारखं काही नसल्यानेच नरेंद्र मोदींनी केला जातीचा उल्लेख - काँग्रेसचा आरोप

मुंबई 17 एप्रिल : निवडणुकीच्या राजकारणात जातीचा वापर करणं हे काही नवीन नाही. किंबहुना निवडणुकीचं राजकारण हे जातीवरच अवलंबून असतं हे कटू वास्तव आहे. प्रचारात अनेक मुद्यांचा वापर केला जात असलं तरी शेवटी सगळं जातीवरच येतं. हाच आजच्या 'न्यूज18 लोकमत'च्या बेधडकचा विषय होता. गेल्या पाच वर्षात कुठलीही विकासकामे झाली नसल्यानेच पंतप्रधान मोदींनी जातींचा उल्लेख केला असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

काँग्रेसचं जातीचं राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये झालेल्या बुधवारच्या सभेत जातीवरून काँग्रेसला टार्गेट केलं. मी विशिष्ट जातीचा असल्यानेच मला टार्गेट केलं गेलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. काँग्रेस सर्वच मोदींना चोर म्हणतं आहेत. त्यांनी मला शिव्या द्याव्यात पण सर्वच मोदींना ते शिव्या देऊन एका जातीलाच टार्गेट करत आहेत असा आरोप केला.

या कार्यक्रमात वंचित आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, काँग्रेसचे सचिन सावंत आणि पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

भाजपचं हीन राजकारण

Loading...

पंतप्रधान जातीचा उल्लेख करून अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केला. भाजपने हिंदूत्वाचं राजकारण करून ते दोन वरून आज सत्ताधारी झाले असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.


सर्वच पक्ष जातीयवादी

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सगळेच पक्ष जातीयवादी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी केला. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष एका विशिष्ट जातीलाच उमेदवारी देतात असा आरोपही त्यांनी केला. वंचित आघाडीने आपल्या उमेदवाराच्या यादीत जातींचा उल्लेख का केला? या प्रश्नावर माळी म्हणाले, अतिशय वंचित असलेल्या जातींचा उल्लेख करणं हा जातीअंताचीच लढाई आहे अशी सारवासारव केली.

'जात' जात नाही ही वास्तव

कुठल्याही नेत्याने जातीचा उल्लेख करणं हे अतिशय अयोग्य आहे. पण उमेदवारी देण्यापासून ते मंत्रिंडळ तयार करण्यापर्यंत प्रत्येक वेळी जातच पाहिली जाते. आपल्या समाज जीवनातही जात आज काढली जाऊ शकत नाही त्यामुळे जात जावी असं म्हणणं हे तरी सध्या फक्त स्वप्नच राहण्याची शक्यता आहे असं मत पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

सर्व मुद्दे जेव्हा संपतात तेव्हा निवडणूक जिंकण्यासाठी जातीचा उल्लेख केला जातो असंही ते म्हणाले. राहुल गांधी यांची जात काँग्रेसने नाही तर भाजपने काढली होती अशी आठवण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला करून दिली. याच मुद्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांची चांगलीच जुंपली. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू केलं असा आरोपही अवधूत वाघ यांनी केला.

निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...