मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची तयारी; असा आहे काँग्रेसचा 'मास्टरप्लॅन'

मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची तयारी; असा आहे काँग्रेसचा 'मास्टरप्लॅन'

मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता काँग्रेसनं मास्टरप्लॅन तयार केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : रविवारी देशात सातव्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर उत्सुकता असेल ती निकालाची. पण, निकालापूर्वी विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी विजयाचा दावा केला. पण, नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी आता मास्टरप्लॅन देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला असून राहुल गांधी यांच्या घरी मीटिंग घेण्यात आली. यावेळी शरद यादव देखील हजर आहेत. काहीही करून भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी आता विरोधकांची एकी दिसून येत आहे.

मतदान अखेरच्या टप्प्यात, सर्वांच्या नजरा पुन्हा उत्तर प्रदेशवर!

राहुल गांधींचा दौरा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चंद्राबाबु नायडू यांची भेट झाल्यानंतर राहुल गांधी लखनऊला जाऊन बसपाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेणार आहेत. तर, चंद्राबाबु नायडू हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत.

काँग्रेसचा ‘मास्टरप्लॅन’

बहुमत न मिळाल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. त्यासाठी सर्व विरोधकांची एकी करण्यावर काँग्रेस लक्ष देत आहे. 2014मध्ये काँग्रेसनं 145 जागा जिंकल्यानंतर देखील सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. शिवाय, 100 जागा जिंकल्यानंतर सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला कुणीच मात देऊ शकत नाही हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सज्ज झालेली दिसून येत आहे. विशेषता सोनिया गांधी यांनी देखील आता त्यामध्ये लक्ष घातलं आहे.

VIDEO: दिल्लीत तरुणावर अंदाधुंद गोळीबार

First published: May 18, 2019, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading