Lok Sabha Election: भाजपची साथ सोडलेल्यांना काँग्रेसने दिली उमेदवारी

Lok Sabha Election: भाजपची साथ सोडलेल्यांना काँग्रेसने दिली उमेदवारी

भाजपला राम राम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दोघांना उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

लखनऊ, 13 मार्च: काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपला राम राम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दोघांना उमेदवारी दिली आहे. यातील पहिली उमेदवारी म्हणजे नाना पाटोले होय. त्यांना नाना यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या खासदार असलेल्या सावित्रीबाई फुले यांना देखील उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. फुले यांच्या प्रवेशावेळी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होते. 2014च्या निवडणुकीत सावित्रीबाई फुले यांनी बहराइचमधून भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेसने त्यांना बहराइचमधूनच त्यांना उमेदवारी दिली आहे.

फुले यांच्याशिवाय फतेहपूरमधील समाजवादी पक्षाचे माजी खासदार राकेश सचान यांना देखील काँग्रेस उमेदवारी दिली आहे. फुले यांच्यासोबतच सचान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणात सहभागी झाल्यानंतर काँग्रेसने भाजपला दोन मोठे धक्के दिले होते.

संबंधित बातमी: LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार

लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून 'हा' उमेदवार रिंगणात!

कारला धडकून तो हवेत उडाला, मुंबईतील थरारक अपघाताचा LIVE VIDEO

First published: March 13, 2019, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading