News18 Lokmat

मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर; 'मैं हिंदुस्थान हूं'

'मैं हिंदुस्थान हूं' म्हणत काँग्रेसनं भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 03:18 PM IST

मोदींना काँग्रेसचं प्रत्युत्तर; 'मैं हिंदुस्थान हूं'

मुंबई, 07 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मैं भी चौकीदार हूं', या कॅम्पेनला आता काँग्रेसनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये 'मैं भी चौकीदार' विरूद्ध 'चौकीदार ही चोर है' असं वाकयुद्ध रंगलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर 'मै भी चौकीदार' असं गाणं काढत भाजपनं काँग्रेसला प्रत्युत्तर दिल होतं. शिवाय, नरेंद्र मोदींसह सर्वच भाजप नेत्यांनी ट्विटरवर देखील 'मैं भी चौकीदार' हे कॅम्पेन सुरू केलं होतं. त्याला काँग्रेसनं आता 'मैं हिंदुस्थान हूं' असा व्हिडीओ तयार करत प्रत्युत्तर दिलं आहे.Loading...
भाजपचं मैं भी चौकीदार
VIDEO: निवडणुकीनंतर 'चौकीदार' जेलमध्ये असेल- राहुल गांधी


राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना केलं लक्ष्य

राफेल करारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. प्रचारसभांमध्ये देखील सध्या जोरदार आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. त्याला भाजप देखील त्याच ताकदीनं उत्तर देत आहे. सत्तेत आल्यास चौकीदारला जेलमध्ये टाकणार अशा आशयाचं विधान देखील राहुल गांधी यांनी केलं होतं.

निवडणुकीच्या धामधुमीत आता आरोप - प्रत्यारोपांना वेग आला आहे. शिवाय, डिजीटल प्रचारावर देखील भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसनं 'मैं हिंदुस्थान हूं' हे गाणं आणलं आहे. जवळपास एक मिनिटाचं हे गाणं आहे. सध्या लोकसभेचा प्रचार जोरात सुरू असून नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे बडे नेते, राहुल गांधी, प्रियांका गांधी जोरदार प्रचार करत आहेत. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून त्यांचा निकाल हा 23 मे रोजी लागणार आहे.
SPECIAL REPORT: हिंगोलीत आजी-माजी शिवसैनिकामध्येच होणार थेट लढत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...