• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • VIDEO : डाव्यांनी बंगालच्या राजकारणात हिंसेला सुरुवात केली - अमित शहा

VIDEO : डाव्यांनी बंगालच्या राजकारणात हिंसेला सुरुवात केली - अमित शहा

'लोकांनी डावे आणि तृणमूलचा दिर्घकाळ अनुभव घेतला आहे. आता त्यांनी भाजपला संधी द्यावी असं आवाहन आम्ही लोकांना केलं आहे.'

 • Share this:
  नवी दिल्ली 06 मे : मतदनाच्या पाचव्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी उडाल्यात. पश्चिम बंगालच्या राजकारणात डाव्या पक्षांनी हिंसाचाराला सुरुवात केली आणि तृणमूल काँग्रेसने तीच परंपरा पुढे नेली असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. News18Indiaला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. अमित शहा म्हणाले, बंगालच्या जनतेने डावे आणि तृणमूलचा हिंसाचार बघितला आहे. दांडगाईच्या बळावर व्यवस्था उभी करण्याचं काम गेली काही दशक या लोकांनी केलं. लोकांनी डाव्यांना बाजूला करून तृणमूलला सत्ता दिली. मात्र त्यांनीही हिंसेचीच परंपरा पुढे चालवली. लोकांनी डावे आणि तृणमूलचा दिर्घकाळ अनुभव घेतला आहे. आता त्यांनी भाजपला संधी द्यावी असं आवाहन आम्ही लोकांना केलं आहे असंही त्यांनी सांगितलं. ममतांची नरेंद्र मोदींवर टीका भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेलं फानी चक्रीवादळ भले ओसरलं असेल पण पश्चिम बंगालच्या राजकारणात आलेलं वादळ मात्र अजून शमलेलं नाही. याउलट दिवसेंदिवस ते तीव्रच होतं आहे. फानी चक्रीवादळाचा धोका असलेल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान कार्यालयाने संपर्क साधला. पंतप्रधान कार्यालयाने ममता बॅनर्जींच्या कार्यालयाशी बोलून माहिती घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा ममतांनी त्यांचा फोनच उचलला नाही, अशी पंतप्रधान कार्यालयाची तक्रार होती. आम्हाला पंतप्रधान कार्यालयाच्या सहानुभूतीची गरज नाही, असं उत्तर आधी ममतांनी दिलं होतं पण आता मात्र मी खरगपूरमध्ये असल्यामुळे फोन घेतला नाही, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. पण त्याचबरोबर मला एक्स्पायरी पंतप्रधानांना भेटायचं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. फानी चक्रीवादळ आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ओडिशा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल अशा दोघांना फोन केला होता. पण पंतप्रधान कार्यालयाने फक्त राज्यपालांना फोन केला, असा आरोप ममतांनी केला होता.
  First published: