विरोधकांची एकत्र येण्याची तयारी, तर भाजपने काढला शपथविधीचा मुहूर्त?

विरोधकांची एकत्र येण्याची तयारी, तर भाजपने काढला शपथविधीचा मुहूर्त?

निवडणुकीआधी एकत्र न आलेले विरोधक पुन्हा एकत्र येण्याची तयारी करत आहेत. तर भाजपने बहुमत मिळणार हे गृहित धरून शपथविधी भव्य आणि ऐतिहासिक होईल याची योजना तयार केलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मे : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान रविवारी होतेय. त्यानंतर मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होणार असून निवडणुकीचा महत्त्वाचा महत्त्वाचा भाग  संपणार आहे. त्यानंतर सगळ्यांनाच वेध लागलेत ते 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीचे. निकाल काय लागणार हे अजुन गुलदस्त्यात असले तरी भाजप आणि विरोधी पक्षांनी आपापली तयारी सुरू केलीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतलाय. तर बहुमत मिळेल या आशेने भाजपने शपथविधीची तयारीही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विरोधक एकत्र येणार?

या निवडणुकीत 2014 सारखी लाट नसल्याने कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असा एक अंदाज व्यक्त होतोय. प्रादेशिक पक्षांना महत्त्व येणार असल्याचाही अंदाज आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊ द्यायचे नाही असा चंगच विरोधी पक्षांनी बांधलाय. त्यासाठी निकालाआधीच विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी विरोधीपक्ष नेत्यांच्या भेठीगाठी सुरू केल्या आहेत.

चंद्राबाबू यांनी आत्तापर्यंत राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, मायावती, एम.के स्ट्रॅलीन यांच्या भेटी घेऊन निकालानंतरच्या परिस्थितीची चर्चा केली केलीय. काँग्रेस आणि सर्व विरोधपक्ष एकत्र आले तर सत्ता स्थापन होऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी  काँग्रेस आणि भाजपला वगळून आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मात्र विरोधी पक्ष एकत्र येण्यात अनेक अडथळे  आहेत असं बोललं जातंय. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. ते भाजपच्या बाजूने जाऊ शकतात असा अंदाज आहे. तर चंद्रशेखर राव हेही गरज पडली तर भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

भाजपची शपथविधीची तयारी

तर दुसरीकडे भाजप आणि मित्रपक्षांना बहुमताचा आकडा गाठता येईल असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय. गरज पडलीच तर काय करायचे याचा आराखडाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तयार केलाय. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे गृहित धरून भाजपने शपथविधीची तयारीही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 2014 मध्ये मोदींनी सार्क देशांच्या प्रमुखांना बोलावून मास्टर स्ट्रोक मारला होता. पुन्हा बहुमत मिळालं तर ते ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

त्यामुळे शपथविधीही तसाच व्हावा यासाठी भाजपचे रणनीतिकार कामाला लगाले आहेत. 23 तारखेला निकाल बाजूने आले तर 26 किंवा 28 मे रोजी शपधविधी होऊ शकतो. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा दिवस आहे. त्या दिवशी शपथविधी होऊ शकतो. या समारंभाला विदेशातले बडे पाहुणे निमंत्रित करण्याचीही भाजपची योजना आहे. एखाद्या मुस्लिम देशाच्या प्रमुखालाही निमंत्रित केलं जाऊ शकते अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: May 19, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading