अखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर!

अखिलेश आणि मायावतींचे मतदारसंघ ठरले, उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर!

मोदींचा 2014 मधला पॅटर्न आता अखिलेश यादव आणि मायातीही अजमावून पाहणार आहेत.

  • Share this:

लखनऊ 21 जानेवारी : उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाची आघाडी झाल्यानंतर भाजपला धडकी भरली आहे. राज्यातलं समिकरण बदलणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आघाडीनंतर सर्वांच लक्ष लागलं होतं ते अखिलेश यादव आणि मायावती यांच्या उमेदवारीकडे. हे दोनही नेते निवडणुक लढणार का याची सगळ्यांना उत्सुकता होती. 'न्यूज18 लोकमत'ला मिळालेल्या EXCLUSIVE माहितीनुसार हे दोनही सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.


मायावती आणि अखिलेश यादव हे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. आणि लवकरच विधानसभा निवडणुकाही नाहीत त्यामुळे या दोघांनीही लोकसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मायवती या पश्चिम उत्तर प्रदेशातून तर अखिलेश यादव हे पूर्व उत्तर प्रदेशातून निवडणुक लढवणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.


मायावती या सहारनपूर आणि अखिलेश हे आझमगडमधू निवडणुक लढतील अशी शक्यता आहे. दोनही नेत्यांसाठी हे अतिशय सुरक्षीत मतदारसंघ आहेत. त्याचबरोबर त्याचा आजुबाजूच्या मतदारसंघावरही परिणाम होण्याची शक्यत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवड करण्यात आल्याचं बोललं जातंय.


2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या वाराणशी या मतदारसंघाची निवड केली होती. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला. तोच पॅटर्न आता अखिलेश आणि मायातीही अजमावून पाहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या