VIDEO भाजपची सगळी भिस्त 'बंगाल' आणि 'ओडिशा'वर

VIDEO भाजपची सगळी भिस्त 'बंगाल' आणि 'ओडिशा'वर

उत्तर प्रदेशमध्ये होणारं नुकसान भाजप पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भरून काढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 13 मे : लोकसभा निवडणुकीच्या आत्तापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यांमध्ये कुणाचं पारडं जड राहणार याची चर्चा होतेय. आत्तापर्यंत सहा टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं असून आता फक्त एका टप्प्याचं मतदान बाकी आहे. 19 मे रोजी शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. झालेल्या सर्व टप्प्यांमध्ये भाजपचेच पारडे जड असून तोच पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिल असं मत CSDSचे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहणार आहे असंही त्यांनी 'सीएनबीसी आवाज'च्या 'चुनावी अड्डा' या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाच्या आघाडीमुळे भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे. 2014 च्या निवडणुकीत अनेक राज्यांमध्ये भाजपला पूर्ण जागा मिळाल्या होत्या. तिथेही यावेळी तेवढ्या जागा मिळणार नाहीत. मात्र पश्चिम बंगाल आणि ओडिशा इथं भाजपला मोठा फायदा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. उत्तर प्रदेशातली भरपाई पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये करण्याची भाजपची योजना आहे असंही बोललं जातंय.

संजय कुमार म्हणाले, प्रत्येक टप्प्यात भाजपने आपलं स्थान मजबूत केलं आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर असणार आहे. मात्र कुणाला नेमक्या किती जागा मिळतील ते सांगता येणार नाही. भाजप आणि काँग्रेसमधलं जागांचं अंतरही फार जास्त असेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

19 मे रोजी सर्व सातही टप्प्यांचं मतदान संपणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत. 2014मध्ये प्रचारात नरेंद्र मोदी यांची जी भाषा होती ती आता बदलली आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार शेषनारायण सिंह यांनी व्यक्त केलं. 2014 च्या निवडणुकीत भ्रष्टाचार, विकास, सुशासन असे मुद्दे होते. पण यावेळी मोदी प्रत्येक टप्प्यात नवे मुद्दे पुढे आणत आहे. विकासाचा मुद्दा मागे पडल्याचंही मतही त्यांनी नोंदवलं.

विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांना कितीही शिव्या घातल्या तरी अजुनही सामान्य माणसांवर नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार अलोक मेहता यांनी व्यक्त केलं. अगदी ग्रामीण भागातही राष्ट्रवादाचा मुद्दा प्रभावी ठरतो आहे असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी हा मुद्दा नसता तर सर्वांनी मोदींना टार्गेट केलं नसतं असही त्यांनी सांगितंल.

First published: May 13, 2019, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading