महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भाजप नेत्याचं निलंबन

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या भाजप नेत्याचं निलंबन

महात्मा गांधींबद्दल केलेलं विधान भाजप नेत्याला भोवलं असून त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : 'गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,' अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट भाजप नेत्यानं लिहिली होती. अनिल सौमित्र असं या भाजप नेत्याचं नाव असून त्याचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह, केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची दखल खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील घेतली होती. त्यानंतर तिन्ही वाचाळवीरांना पक्षाच्या अनुशासन समितीनं नोटीस पाठवत 10 दिवसामध्ये उत्तर देण्यास सांगितले होते. पण, आता भाजपनं अनिल सौमित्र यांचं निलंबन केलं आहे. तर, साध्वी प्रज्ञासिंह या भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. यापूर्वी त्यांनी हेमंत करकरेंबद्दल देखील विधान केलं होतं. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबताना दिसत नाही.

गुलाम नबी आझादांची पलटी, आता म्हणतात काँग्रेस पंतप्रधानपदासाठी तयार

साध्वींच्या विधानावर काय बोलले मोदी

साध्वींच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं असता ते म्हणाले, "हे वक्तव्य घृणास्पद आहे. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. गांधीजींबद्दल असं काही बोलणं निषेधार्थच आहे. साध्वी प्रज्ञा यांनी झाल्या प्रकारची माफी मागितली हे खरं. पण मी मनापासून त्यांना माफ करू शकणार नाही."

साध्वींच्या विधानाचं केंद्रीय मंत्र्याकडून समर्थन

साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेलं वक्तव्य योग्यच आहे,' असं भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं. 'साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागायची गरज नाही. 70 वर्षानंतरही आजची पिढी याबाबत बोलते याबद्दल मला आनंद वाटतो. गोडसे यांच्या अत्म्यालाही समाधान, आनंद मिळत असेल,' असं अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे.

VIDEO: '...अन्यथा एकाही मंत्र्यांला मराठवाड्यात फिरू देणार नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading