PM मोदी आणि अमित शहा यांची झोप उडवणारा सर्व्हे; उत्तर प्रदेशात केवळ 20 जागा!

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी बेरीज-वजाबाकी देखील सुरु झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 02:53 PM IST

PM मोदी आणि अमित शहा यांची झोप उडवणारा सर्व्हे; उत्तर प्रदेशात केवळ 20 जागा!

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी बेरीज-वजाबाकी देखील सुरु झाली आहे. दिल्लीच्या सत्तेची वाट ही उत्तर प्रदेशमधून जात असल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन मुख्य पक्षांनी येथील 80 जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच बरोबर राज्यातील सपा आणि बसपा हे पक्ष देखील आहेतच. 2014च्या निवडणुकीत ऐतिहासिक 71 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट अन्य कोणी नाही तर खुद्द भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे.

बिहारचे लोक आले नाही तर महाराष्ट्रातील कारखाने बंद होतील- सुशील कुमार मोदी

लोकसभा निवडणुकीत भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. यानुसार राज्यातील 51 जागांवर भाजपचे नुकसान होणार आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला होता. राज्यातील 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी भाजपच्या जागा 71 वरून थेट 20वर येण्याची शक्यता आहे. राज्यात बसपा आणि सपाची आघाडी झाली आहे. त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. बसपा-सपाच्या आघाडीमुळे यंदा राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते.

इंदिरांपासून मोदींपर्यंत....पवारांनी थोपवल्या मोठ्या लाटा, आता फडणवीस कसा देणार धक्का?

राज्यातील 14 मोठ्या शहरातील 8 जागांवर सपा तर 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. उर्वरित 38-38 जागांवर सपा आणि बसपा निवडणूक लढवणार आहे. त्यातच मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना रोखण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले आहे. याचा फायदा काँग्रेसला काही प्रमाणात होऊ शकतो.

Loading...


VIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...