VIDEO पंतप्रधानपदावर डोळा असणाऱ्या सगळ्यांची स्वप्न भंगतील - अमित शहा

VIDEO पंतप्रधानपदावर डोळा असणाऱ्या सगळ्यांची स्वप्न भंगतील - अमित शहा

'मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर भाजपला मोठं बहुमत मिळतं आहे. खूप मोठा अंडरकरंट आहे. हा अंडरकरंट सरकारच्या बाजूने आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 07 मे : लोकसभेच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. आता फक्त दोन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. यावेळी कुठल्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही असेही अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रादेशीक पक्षांच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचं 'निवडणूक मशिन' अशी ओळख असलेले अमित शहा यांनी मोठा दावा केलाय. पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणाऱ्या सगळ्या नेत्यांची स्वप्न 23 मे रोजी भंग होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'न्यूज18 इंडिया'ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

अमित शहा म्हणाले, गेल्या पाच वर्षात 22 कोटी गरीब लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या आहेत. त्या गरिबांना सर्व योजनांचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे  सामान्य नागरिक सरकारच्या बाजूने आहेत. आम्ही फक्त घोषणा केल्या नाहीत तर थेट सामान्य माणसांच्या दारापर्यंत त्याचा फायदा पोहोचवला असंही ते म्हणाले.

मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर भाजपला मोठं बहुमत मिळतं आहे. खूप मोठा अंडरकरंट आहे. हा अंडरकरंट सरकारच्या बाजूने आहे. आम्ही 2014 पेक्षा जास्त जागा मिळवू, आमच्या जागांचं मार्जिनही वाढेल तर ज्या प्रदेशांमध्ये आमची पोहोच नव्हती त्या प्रदेशांमध्येही आम्ही आमचं अस्तित्व निर्माण करू.

भाजप फक्त याच निवडणुकीत नाही तर पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवाद हाच आमचा अजेंड असतो. राष्ट्रीय सुरक्षा, खंबीर नेतृत्व, निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या प्रचारातले मुद्दे असणार आहेत. यावेळी कुठल्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही असेही अंदाज व्यक्त होत आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रादेशीक पक्षांच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बसपच्या प्रमुख मायावती यांनीही अप्रत्यक्षपणे आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गरज पडली तर लोकसभेची पोटनिवडणुक लढविण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल हे 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत. यात प्रमुख आहेत बसपाच्या नेत्या मायावती. 2014 मध्ये मायावतींना उत्तर प्रदेशातून एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी कधी काळी कट्टर शत्रू असलेले सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मायावतींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आंबेडकरनगर इथं झालेल्या जाहीर सभेत मायावती म्हणाल्या, जर काही चांगलं झालं तर मी याच मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवू शकते. या आधीही मी अनेकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचा अर्थ हा मायावतींनी पंतप्रधानपदावर आपली दावेदारी सांगितली असा काढला जातोय.

तर शरद पवार, चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राजकीय फेरजुळवणी करता येवू शकते का याची चाचपणी सर्वच नेते करत आहेत. पण 23 मे रोजी लागणाऱ्या निकालांवर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

23 मे पर्यंत सर्वच नेते हा खेळ खेळतील आणि निकालानंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा दावा भाजपने केला आहे. तर 21 मे रोजी सर्व पक्षांची नवी दिल्लीत बैठक होणार असून त्यांना त्यात पंतप्रधानपदाचा आघाडीचा उमेदवार ठरेल अशी घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.

First published: May 7, 2019, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading