News18 Lokmat

'भाजपला फक्त हिंदू, मुस्लिम आणि पाकिस्तान मुद्यांवर निवडणूक लढवायची आहे'

'साध्वी, चिथावणीखोर वक्तव्य, हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान या विषयांवर निवडणूक आली की इतर सर्व मुद्दे मागे पडतात '

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 10:50 PM IST

'भाजपला फक्त हिंदू, मुस्लिम आणि पाकिस्तान मुद्यांवर निवडणूक लढवायची आहे'

नवी दिल्ली 22 एप्रिल : भाजपला लोकांच्या मुद्यांवर नाही तर भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवायची आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, बेरोजगार हे भाजपच्या अजेंड्यावरचे मुद्दे नाहीत. तर त्यांना हिंदू, मुस्लिम, आणि पाकिस्तान यासारख्या विषयांवर प्रचार न्यायचा आहे असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. खऱ्या मुद्यांपेक्षा भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवणं सोपं असतं त्यातून मत मिळवता येतात असंही ते म्हणाले.

प्रचार रुळावरून घसरला?

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असून मंगळवारी तीसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या प्रचारावर बोलताना यादव म्हणाले, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचाराची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरली. भाजपला आणि सरकारलाही तेच पाहिजे होतं कारण खऱ्या मुद्यांवरून सरकारला लक्ष विचलित करायचे होते त्यात त्यांना यश आल्याचं दिसतेय.Loading...

कमकुवत विरोधक

साध्वी, चिथावणीखोर वक्तव्य, हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान या विषयांवर निवडणूक आली की इतर सर्व मुद्दे मागे पडतात हे आत्तापर्यंत दिसून आलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षही या प्रचाराचा मुकाबला करण्यास समर्थ नाही. देशात अनेक ठिकाणी दुष्काळ आहे, शेतकरी त्रस्त आहेत अशा पार्श्वभूमीवर प्रचाराने पातळी सोडणे हे धोकादायक असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी हवाई हल्ल्यांबाबत आणि पुलवामाच्या घटनेवरून सरकारवर टीका केली होती. हल्ल्यात नुकसान झाले त्याचे पुरावे द्या अशी मागणी केली होती. त्यावरून भाजपने त्याचा उपयोग करून घेतला आणि देशभक्त आणि देशद्रोही अशी घोषणा देऊन वातावरण तापविण्याचंही काम केलं.दिवाळी, ईद आणि अणुबॉम्ब

भारताकडे असलेले अणुबॉम्ब हे फक्त दिवाळीसाठी आहेत का? असा प्रश्न रविवारी पंतप्रधांनांनी प्रचारसभेत विचारत पाकिस्तानवर टीका केली होती. त्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी आज उत्तर दिलं. पाकिस्तानने त्यांचे अणुबॉम्ब हे काय 'ईद'साठी ठेवले का अशी प्रतिक्रिया मेहबुबा यांनी व्यक्त केली. मुफ्ती यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी तीसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेहबुबांनी हे वक्तव्य केलं अशीही टीका केली जातेय.जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी महेबुबांवर जोरदार टीका केलीय. पाकिस्तान पंतप्रधान मोदींना उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने मुफ्ती या असं वक्तव्य करत आहेत. अशा प्रकारची वक्तव्य करणं हे अत्यंत चूक आहे आणि जनता त्यांना धडा शिकवेल असंही ते म्हणाले.

तर पीडीपीने भाजपवर पलटवार केलाय, पंतप्रधानांनी दिवाळीसाठी अणुबॉम्ब आहेत का असं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही असं मत पीडीपीचे प्रवक्ते सुहेल बुखारी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्रधोरणाचे तीन तेरा वाजवले. ज्या अर्थाने पंतप्रधानांनी वक्तव्य केलं त्याला मेहबुबांनी फक्त उत्तर दिलं असं म्हणत त्यांनी मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्याचं जोरदार समर्थन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...