शत्रुघ्न सिन्हा आज करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 09:51 AM IST

शत्रुघ्न सिन्हा आज करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

पाटना, 06 एप्रिल : पाटनाचे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी वेळोवेळी भाजपला लक्ष्य केलं. शिवाय, नरेंद्र मोदींवर टीका केली. परिणामी, त्यांना पक्ष नेतृत्वानं पाटनातून उमेदवारी नाकारली. अखेर शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे म्हणून त्याची निवड केल्याची प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. यापूर्वी सपा, बसपा आणि आपनं देखील पक्ष प्रवेशासाठी आग्रह केला होता अशी माहिती देखील सिन्हा यांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना काँग्रेस पाटना लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देणार असल्याची देखील चर्चा आहे.


पत्नी देणार राजनाथ सिंह यांना आव्हान

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांची आई पूनम सिन्हा या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. त्यांना समाजवादी पक्षाकडून लखनऊमधून उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे या लढतीकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


Loading...

वडिलांच्या निर्णयावर काय म्हणाली सोनाली?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वडील आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचं समर्थन केलं आहे. सोनाक्षीने स्पष्टपणे सांगितलं की, बाबांनी फार आधीच भाजप पक्ष सोडायला हवा होता. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटतं की त्यांना हे फार आधीच करायला हवं होतं. त्यांना पक्षात तो सन्मान मिळत नव्हता जो मिळणं त्यांचा हक्क आहे. ही त्यांचा आवडीची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतः आनंदी किंवा समाधानी नसाल तर तुम्हाला बदल घडवावा लागतो. त्यांनीही नेमकी हेच केलं.’


VIDEO: माझं नाव आफताब जहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...