‘मुंबईतून प्रवास सुरू केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार पंजाबमध्ये भेटेल’

‘मुंबईतून प्रवास सुरू केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार पंजाबमध्ये भेटेल’

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजप आमदाराचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचं सिद्ध झालं. भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAदेखील 350ला जाऊन पोहोचली. देशातील जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र जागांचं शतक देखील गाठता आलं नाही. काही राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मोदींची जादू अद्यापही कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. यावरून सोशल मीडियावर अनेक जोक्स देखील व्हायरल होत आहेत. पण, यामध्ये भाजपच्या आमदारानं केलेलं ट्विट लक्षवेधी ठरत आहे. ‘चर्चगेटवरुन ट्रेन पकडून उत्तरेकडे प्रवास केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये भेटेल’ असं उपरोधिक ट्विट केलं आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.
...म्हणून 6 आमदारांना 15 दिवसांत द्यावा लागणार राजीनामा

कोण आहेत आमदार

हर्ष संघवी असं या आमदाराचं नाव आहे. हर्ष संघवी हे सुरतमधील मजुरा येथील आमदार आणि भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुम्ही चर्चगेटवरून ट्रेन पकडून उत्तरेकडे प्रवास केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार पंजाबमध्ये सापडेल असं हर्ष संघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअपवर सध्या हर्ष संघवी यांच्या ट्विटचा मेसेज फॉरवर्ड होत आहे.


कोकणात नारायण राणेंच्या पराभवामागे ही आहेत कारणं

देशात भाजप

2014च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा देखील जास्त जागा यावेळी भाजपनं जिंकल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं आहे. केवळ पंजाबमध्ये 13 पैकी 8 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला 40 टक्के तर भाजपला 10 टक्के मतं मिळाली आहेत.


प्रकाश आंबेडकरांमुळे निवडणुकीची समीकरणं कशी बदलली? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या