नरेंद्र मोदींचं 'जाती'चं नाही तर 'विकासा'चं राजकारण, जेटलींचं मायावतींना उत्तर

नरेंद्र मोदींचं 'जाती'चं नाही तर 'विकासा'चं राजकारण, जेटलींचं मायावतींना उत्तर

'मोदींनी कायम विकासाचं राजकारण केलं. जातीचं राजकारण कोण करतं हे सगळ्या जगाला माहित आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 29 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच जातीचं राजकारण करत नाहीत. त्यांनी कायम विकासाचं राजकारण केलं. जातीचं राजकारण कोण करतं हे सगळ्या जगाला माहित आहे असा पलटवार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मायावतींवर केला आहे. मोदी हे जातीचं राजकारण करतात. ते मागसलेले नाहीत तर मीच अतिमागासलेली आहे अशी टीका बसपाच्या नेत्या मायावती यांनी केली होती. त्याला जेटलींनी आज उत्तर दिलं.

लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला तसे नेत्यांच्या आरोप आणि प्रत्यारोपांनाही वेग आलाय. उत्तर प्रदेशातल्या एका जाहीर सभेत बोलताना आपण मागसलेल्या वर्गातून आलो आहोत असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. दलीत ही बसपाची व्होट बँक असल्याने पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे नुकसान होईल अशी भीती मायावतींना वाटत होती.

त्याला छेद देण्यासाठी मायावतींनी एका जाहीर सभेत आपण अतिमागासलेल्या वर्गातून आलो आहेत असं म्हटलं होतं. मायावती म्हणाल्या, मोदी हे उच्च जातीतून येतात. मात्र मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत:ला ओबीसीमध्ये घातलं आहे अशी टीका केली होती. त्यालाच अरुण जेटली यांनी उत्तर दिलं.

नरेंद्र मोदींच राज ठाकरेंना उत्तर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची सध्या देशभर चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राज ठाकरे हे आपल्या सभांमधून सडकून टीका करत आहेत. ते सभांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि पुरावा म्हणून प्रत्यक्ष काही माणसांनाच सादर करत असल्याने त्यांच्या सभांची चर्चा होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज हे 'आऊटसोर्स' केलेले नेते आहे. लोक सगळं समजतात अशी टीका त्यांनी केली. 'दैनिक लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली.

राज हे 'आऊटसोर्स' नेते

राज ठाकरे हे आधी आपले प्रशंसक होते. मात्र सध्या ते मोदी आणि शहा यांच्या विरोधात रान उठवत आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, हा राजकारणाचा भाग आहे. आज काल 'आऊटसोर्स' केले जाते. हेही तसेच आहे. जनता हुशार आहे. कोण काय आणि कशासाठी बोलतं हे जनतेला नीट कळतं. मतदानातून लोक ते दाखवून देतात. गुजरातमध्येही विधानसभा निवडणुकीत असेच आऊटसोर्सिंग झाले होते. काही तरुणांना काँग्रेसने हाताशी धरून त्यांचा वापर केला होता. पण त्याने काहीही साध्य झाले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 11:14 PM IST

ताज्या बातम्या