VIDEO जिंकण्याची क्षमता नाही, स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं, भाजपची टीका

VIDEO जिंकण्याची क्षमता नाही, स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचं, भाजपची टीका

निवडणुकीच्या आधी काही महिन्यांपर्यंत विरोधी पक्षांनी एकीचं दर्शन घडवलं होतं. मात्र निवडूक जशी जवळ येत गेली तसं विरोधकांमध्ये मतभेदाला सुरुवात झाली.

  • Share this:

नवी दिल्ली 08 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. तर मतदानाचे दोनच टप्पे शिल्लक आहेत. मतदानाचे टप्पे जसे संपत आहेत तशा विरोधकांच्या हालचालींना वेग आलाय. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी हालचालींना वेग दिला आहे. या सगळ्या हालचालींवर भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी जोरदार टीका केलीय. ज्या पक्षांमध्ये जिंकण्याची क्षमता नाही अशा पक्षांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत असल्याची टीका त्यांनी केलीय.निवडणुकीच्या आधी काही महिन्यांपर्यंत विरोधी पक्षांनी एकीचं दर्शन घडवलं होतं. मात्र निवडूक जशी जवळ येत गेली तसं विरोधकांमध्ये मतभेदाला सुरुवात झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाला जे चित्र होतं ते नंतर कधीच दिसलं नाही. विरोधकांमध्ये ऐकी नसल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला त्याचा चांगला फायदा मिळला.निवडणुकीच्या पाच टप्प्यानंतर काही अंदाज बांधता येऊ शकतात. त्यानुसार भाजप हा इतर पक्षांच्या खूप पुढे असेल असं मत CSDSचे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं. भाजप हा काँग्रेसपेक्षा दुपटीपेक्षा पुढे असेल असंही ते म्हणाले.निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची सध्या राळ उठलीय. मतदानाचे शेवटचे दोन टप्पे राहिल्याने सर्वच नेत्यांनी आपले हल्ले तीव्र केले आहेत. शिव्यांचा यथेच्छ वापर होतोय. काँग्रेस कितीही साळसुदपणाचा आव आणत असला तरी प्रेमाच्या आडून शिव्यांचा वापर आता चालणार नाही असा पलटवार भाजपने केलाय. पंतप्रधानांच्या टीकेचं राजकीय भांडवलं करणारी काँग्रेस गेली 18 वर्ष पंतप्रधान मोदींना शिव्यांची लाखोळी वाहत आहे अशी टीका भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केलीय. दररोज मिळणाऱ्या शिव्यांमुळेच मला उर्जा मिळते असं पंतप्रधांनी सांगितलं होतं असं भाजपने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 10:15 PM IST

ताज्या बातम्या