'मतांच्या राजकारणात जन्म होण्याआधीच 'विकास'चा मृत्यू झाला'

'मतांच्या राजकारणात जन्म होण्याआधीच 'विकास'चा मृत्यू झाला'

'अल्पसंख्याकांची संख्या जास्त असल्यानेच व्होट बँकेच्या राजकारणासाठीच दिग्विजयसिंगांना भोपाळमधून उमेदवारी दिली.'

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : गेल्या पाच वर्षात भाजपने फक्त विकासाच्या बाता मारल्या मात्र विकास केला नाही. आत भाजप आपल्या खऱ्या अजेंड्यावर आला असून जन्म होण्याआधीच 'विकास'चा मृत्यू झाला असं मत राजकीय विश्लेषक अलीमुद्दी खान यांनी व्यक्त केलं. CNNnews18 च्या TheRightStand या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

तर अल्पसंख्याकांची संख्या जास्त असल्यानेच व्होट बँकेच्या राजकारणासाठीच दिग्विजयसिंगांना भोपाळमधून उमेदवारी दिली असं मत भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहन यांनी व्यक्त केलं. दिग्विजयसिंग यांना धडा शिकविण्यासाठीच भाजपने साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आता ध्रुविकरणाचं राजकारण पुन्हा होणार अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपचा राजकीय डाव

दिंग्विजय सिंग यांनी हिंदू दहशतवाद, राम मंदिर आणि दहशतवादाच्या मुद्यावरून अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. त्यांच्या विधानांवरून अनेकदा वादही निर्माण झाले होते. मुस्लिमांची मते मिळविण्यासाठीच ते अशी विधानं करतात असेही आरोप झाले होते. भाजपने आक्रमकपणे त्यांची प्रतिमा हिंदू विरोधी अशी रंगवली. आता त्या प्रतिमेचा फटका त्यांना बसत असून आपली सॉफ्ट हिंदूत्वाची प्रतिमा रंगविण्यासाठी त्यांनी नंतर प्रयत्न केला.

भोपाळ मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे त्याचा फायदा मिळेल असं वाटल्यानेच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असाही आरोप होतोय.

कोण आहेत प्रज्ञा ठाकूर

भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमीच हिंदू दहशतवादावरून भाजपला लक्ष्य केलं आहे.आता ते विरुद्ध साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लढत असल्याने इथला प्रचार स्फोटक होण्याची चिन्हं आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी होत्या पण 9 वर्षं तुरुंगात काढल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एकेक विधानं करायला सुरुवात केली होती. तुरुंगात आपला सलग 23 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला होता. आपल्याला जाणुनबुजून या दहशतवादी कटात गोवण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद नावाचा एक खोटा शब्द आणला आणि हे सिद्ध करण्यासाठीच आपल्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले, असंही त्यांचं म्हणणं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading