दिल्लीतील भाजपच्या या निर्णयानं काँग्रेस ‘शॉक’

दिल्लीतील भाजपच्या या निर्णयानं काँग्रेस ‘शॉक’

दिल्लीमध्ये भाजपनं काँग्रेसला धक्का दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता दिल्लीत कोण बाजी मारणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. काँग्रेस आणि आपनं एकत्र येत भाजपला टक्कर देण्याचा निर्णय घेतला. पण, ती बोलणी देखील फिस्कटली. दरम्यान, काँग्रेसनं अद्याप देखील दिल्लीतील आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. पण, आता भाजपनं आपले 4 उमेदवार घोषित करत काँग्रेसला धक्का दिला आहे. चांदनी चौकातून डॉ. हर्षवर्धन, नॉर्थ इस्ट दिल्लीतून मनोज तिवारी, वेस्ट दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि साऊथ दिल्लीतून रमेश बिधूडींना भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवाय, पंजाबमधील अमृतसर आणि उत्तर प्रदेशातील घोसीमधून देखील उमेदवारांची भाजपनं केली आहे.

अमृतसरमधून उत्तर प्रदेशातील भाजपचे राज्यसभा खासदार हरदीप पुरी यांना उमेदवारी दिली आहे. 2014मध्ये अमृतसरमधून अरूण जेटली यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर घोसीमधून हरिनारायण राजभर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनं दिल्लीतून 4 विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीनंतर BJDसाठी सर्व पर्याय खुले - नवीन पटनायक

23 एप्रिल शेवटची तारीख

दिल्लीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 23 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे. पण, काँग्रेसनं अद्याप देखील आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. दरम्यान दिल्लीत काँग्रेसची ताकद असल्याचं म्हणत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी आपशी आघाडी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे दिल्लीत कोण जिंकणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO : पवारांचा असेल बालेकिल्ला, आठवलेंची अशीही कविता

First published: April 21, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading