जेसलमेर, 18 मार्च: लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार याबद्दल जसे माध्यमांकडून सर्व्हे केले जातात आणि अंदाज बांधला जातो. त्याच प्रमाणे सट्टा बाजारात देखील देशात कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज वर्तवला जातो. राजस्थानमधील सट्टा बाजारानुसार देशात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता येणार आहे. जोधपूरजवळच्या फालोडी येथील सट्टा बाजारानुसार भाजपला यंदा 250हून अधिक जागा मिळतील. तर एनडीएला 300 ते 310 जागा मिळतील.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला काँग्रेसला 100 जागा मिळतील असा अंदाज होता. पण सध्या काँग्रेसला 72 ते 74 जागा मिळतील. राजस्थानमधील लोकसभेच्या जागांचा विचार केल्यास राज्यातील 25 पैकी 18 ते 20 जागांवर भाजप विजयी होईल.
सट्टेबाजारानुसार पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा मोदी सरकारला फायदा होईल. या घटनेमुळे मतदार भाजपला मत देतील. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या आधी सट्टेबाजाराचा असा अंदाज होता की एनडीएला 280 जागा तर भाजपला 200 जागा मिळतील. पण हवाई दलाच्या कारवाईने मतदारांचा कल बदलला असल्याचे सट्टेबाजाराचे मत आहे.
VIDEO: प्रकृती बिघडल्यामुळे पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं; पवार यांनी व्यक्त केला शोक