'खोटं बोला पण रेटून बोला हा काँग्रेसचा अजेंडा '

'खोटं बोला पण रेटून बोला हा काँग्रेसचा अजेंडा '

  • Share this:

नवी दिल्ली 23 एप्रिल :  राफेल प्रकरणावर काँग्रेस खोटा प्रचार करत आहे. या प्रकरणाची दोन न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं जनतेचं न्यायालय. या दोनही न्यायालयांमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार निर्दोष सुटतील असा दावा भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केलाय. न्यूज18 इंडियाच्या हम तो पुछेंगे या कार्यक्रमात झालेल्या वाद विवादात ते बोलत होते. खोटं बोला पण रेटून बोला हा काँग्रेसचा अजेंडा आहे असंही ते म्हणाले.

तर काँग्रेसचे प्रवक्ते अभय दुबे म्हणाले, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने दिलेले नोटीस हा तांत्रिक मुद्दा असून चौकिदार चोर है या घोषणेवर काँग्रेस कायम आहे असा दावाही त्यांनी केल. सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटलं असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं त्यावरून त्यांनी कोर्टात दिलगीरीही व्यक्त केली होती. मात्र फक्त दिलगीरी पुरेशी नसल्याचं भाजपच्या मिनाक्षी लेखी यांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे कोर्टाने त्यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे.

आज कोर्टात काय झालं?

राफेल प्रकरणामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'चौकीदार चोर है' म्हणत हल्लाबोल चढवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना कोर्टाचा अवमान प्रकरणी नोटीस पाठवत स्पष्टीकरणाची मागणी केली. यावर सोमवारी ( 23 एप्रिल ) राहुल गांधी यांनी आपल्याकडून चुक झाल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयात दिलं. पण, राहुल गांधी यांच्या स्पष्टीकरणावर न्यायालय समाधानी नाही त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी ही 30 एप्रिलला होणार आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राफेल प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौकीदार चोर है अशी टीका केली होती. त्यावर मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत 22 एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला होता. 'निवडणुकीच्या धामधुमीत मी ते वक्तव्य केलं होतं. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं होतं.

नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

दरम्यान, राफेल प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. आपल्या प्रचारसभांमधून देखील राहुल गांधी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. शि्वाय, अनिल अंबानी यांना नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटींचा फायदा करून दिला असा आरोप देखील राहुल गांधी करत आहेत.

First published: April 23, 2019, 11:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading