S M L

'गांधी परिवाराने देशाला लुटण्याचं काम केलं'

जो पैसा मोदींनी उद्योगपतींना दिला तोच पैसा काँग्रेस गरीबांना देणार असल्याचं काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश यांनी सांगत भाजपवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला.

Updated On: Apr 19, 2019 10:33 PM IST

'गांधी परिवाराने देशाला लुटण्याचं काम केलं'

जयपूर 19 एप्रिल : देशातल्या प्रत्येक गरिबाला वर्षाला 72 हजार रुपये देण्याच्या काँग्रेसच्या न्याय योजनेवर अजुनही चर्चा सुरूच आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी गरिबी हटविण्याचं आश्वास दिलं मात्र गरिबी संपली नाही आणि आता राहुल गांधी यांनी तेच आश्वासन पुन्हा देत आहेत असा आरोप भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. गांधी परिवाराने फक्त देशाला लुटण्याचं काम केलं आहे असा आरोपही त्यांनी केला. न्यूज18 इंडियाच्या आर पार या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला.

निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या 'न्याय' या योजनेची घोषणा करून भाजपवर मात करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची चर्चाही देशभर होत आहे. गरिबी हटाओ हा काँग्रेसचा गेल्या कित्येक दशकांचा नारा असल्याने काँग्रसला भाजपने सवाल केलाय. काँग्रेसची ही जुमलेबाजी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.




तर काँग्रेसची योजना ही विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. जो पैसा मोदींनी उद्योगपतींना दिला तोच पैसा काँग्रेस गरीबांना देणार असल्याचं काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश यांनी सांगत भाजपवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. युपीएच्या काळात 15 टक्के गरिबी कमी झाली असा दावाही मोहन प्रकाश यांनी केला. ज्या लोकांनी रोजगार हिरावून घेतला, तरुणांना बेरोजगार केलं त्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले.


Loading...


'न्याय' म्हणजे लाच आहे का?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसनं न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेतंर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला 6 हजार तर वर्षाला 72 हजार रूपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली. पण, या योजनेची दखल अलाहाबाद हायकोर्टानं घेतली असून त्याबाबत कोर्टानं काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे गरिबांना लाच दिली जात आहे, असं का समजू नये? असा सवाल हायकोर्टानं काँग्रेसला केला आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय उत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.



कुणी दाखल केली याचिका?

मोहित कुमार या वकिलानं अलाहाबाद हायकोर्टात काँग्रेसच्या न्याय योजनेविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती गोविंद माथूर आणि न्यायमूर्ती एसएम शमशेरी यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं अशी घोषणा म्हणजे मतदारांना लाच देत असल्याचा प्रकार नाही का? त्यासाठी पक्षावर बंदी किंवा इतर कोणतीही कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल केला आहे.



निवडणूक आयोगाकडून देखील न्यायालयानं यावर उत्तर मागितलं आहे. उत्तरासाठी काँग्रेस आणि निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. अशी योजना म्हणजे लाच दिल्यासारखं असल्याचं मत न्यायालयानं यावेळी व्यक्त केलं आहे.



काँग्रेस सध्या न्याय योजनेचा जोरदार वापर प्रचारादरम्यान करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेम चेंजर ठरू शकते असं देखील काही राजकीय निरिक्षकाचं मत आहे. या योजनेतंर्गत देशातील 20 कोटी गरिबांच्या खात्यात महिना 6 हजार रूपये जमा करण्यात येणार आहेत. तर, वर्षाला ही रक्कम 72 हजार रूपये असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 10:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close