गांधी घराण्याच्या 'या' बालेकिल्ल्याला भाजप खिंडार पाडणार का?

गांधी घराण्याच्या 'या' बालेकिल्ल्याला भाजप खिंडार पाडणार का?

अमेठीमध्ये काँग्रेसलवा भाजपला आव्हान दिलं आहे. त्यामुळे अमेठीच्या लढाईकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

अमेठी, अनिल राय, 14 एप्रिल : अमेठी! काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ. शिवाय, काँग्रेसचा गड म्हणून देखील अमेठीकडे पाहिलं जातं. कारण, अमेठी कायम गांधी घराण्याच्या मागे उभी राहिली आहे. पण, काँग्रेसच्या याच गडावर कब्जा करण्यासाठी भाजप युद्धपातळीवर जोरदार तयारी करत आहे. स्मृती इराणी यांनी 2014मध्ये देखील राहुल गांधी यांना आव्हान दिलं होतं. तसेच 2019मध्ये देखील स्मृती इराणी विरूद्ध राहुल गांधी अशी लढत रंगणार आहे. 1977 आणि 1998 वगळता 1967 पासून आत्तापर्यंत काँग्रेसनं अमेठीमध्ये कायम विजय मिळवला आहे.

1980मध्ये संजय गांधी या ठिकाणाहून खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. त्यानंतर 1981, 1954, 1989 आणि 1991मध्ये राजीव गांधी यांच्यामागे अमेठी खंबीरपणे उभी राहिली.  1996मध्ये अमेठीमधून काँग्रेसचे सतीश शर्मा विजयी झाले.  तर, 1999मध्ये सोनिया गांधी अमेठीमधून विजयी झाल्या होत्या.

'हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला', साध्वी प्रज्ञासिंह यांची मुक्ताफळं

काय आहे अमेठीचा इतिहास

गांधी परिवारातील कुणीही व्यक्ती अमेठीतून निवडणूक लढवत असल्यास ती विजयी झाली आहे हा आजवरचा इतिहास! 2004, 2009 आणि 2014मध्ये राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये विजय मिळवला. आत्तापर्यंत अमेठीमधून गांधी घराण्यातील 4 जण खासदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यामुळे काहीही करून काँग्रेसला अमेठीमध्ये धुळ चारायची यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं पूर्ण ताकद आणि लक्ष अमेठीमध्ये केंद्रीत केलं आहे. 2014मधील लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आम आदमी पक्षानं देखील काँग्रेसला आव्हान दिलं होतं. भाजपच्या वतीनं स्मृती इराणी तर आपकडून कुमार विश्वास यांनी 2014मध्ये लोकसभा निवडणूक अमेठीमध्ये लढवली होती.

पण, त्यानंतर देखील अमेठीनं काँग्रेसचा हात सोडला नाही. मोदी लाटेत देखील राहुल गांधी 1 लाखाच्या मताधिक्यांनी निवडून आले होते. कुमार विश्वास यांचं तर डिपॉझित जप्त झालं होतं. पण, 2019मध्ये काहीही करून भाजपला अमेठी जिंकायची आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना काहीही करून 2014च्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी मागील पाच वर्षापासून इराणी अमेठीमध्ये ठाण माडून कामं करत आहेत. शिवाय, विशेष लक्ष देखील ठेवून आहेत.

करकरेंबाबत साध्वींच्या वक्तव्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जातीय समीकरणं

अमेठीमध्ये 17 लाख मतदार आहेत. यामध्ये जातीचं समीकरण देखील महत्त्वाचं ठरतं. अमेठीमध्ये 22 टक्के ओबीसी, 18 टक्के मुसलमान, 15 टक्के एससी आणि 12 टक्के ब्राह्मण मतदार आहेत.

भाजप सवर्ण आणि ओबीसींच्या आधारे काँग्रेसला मात करू इच्छिते. शिवाय, विकासाचा देखील हवाला दिला जात आहे. स्मृती इराणी या सातत्यानं गांधी घराण्यावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. तर काँग्रेसला विकासकामं आणि गांधी घराण्याचा करिष्मा यावर विश्वास आहे. त्यामुळे अमेठीमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

करकरेंबाबत साध्वींच्या वक्तव्यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

First published: April 19, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading