दिग्विजय सिंह यांना कुणाचं आव्हान? भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांची नावं चर्चेत

दिग्विजय सिंह यांना कुणाचं आव्हान? भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांची नावं चर्चेत

भोपाळमधून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 13 एप्रिल : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार देताना भाजप विशेष काळजी घेताना दिसत आहे. कारण, भोपाळच्या जागेवर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात कुणाला उभं करायचं? यावर आता पक्ष गांभीर्यानं विचार करताना दिसत आहे. कारण, दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासासाठी आता भाजप माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराज सिंह चौहान यांना मैदानात उतवरण्याच्या तयारीमध्ये आहे. पण, अद्याप कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. झाशीच्या खासदार असलेल्या उमा भारती या निवडणूक लढवण्याकरता फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळे भोपाळमध्ये भाजपचा उमेदवार कोण? हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर मुरैना या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भोपाळमध्ये भाजपचा कोण? हे पाहावं लागणार आहे.

माढ्यात राष्ट्रवादीची 'पॉवरफुल' खेळी, भाजपला धक्का

काय होणार निर्णय

दरम्यान केंद्रीय मंत्री असलेल्या उमा भारती यांनी भाजप आणि संघाच्या नेत्यांशी दिल्लीमध्ये चर्चा केली. भोपाळमधून लढण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची चर्चा आहे. पण, शिवराज सिंग यांच्यानावार पक्ष गांभीर्यानं विचार करत आहे. शिवाय, साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर देखील भोपाळमधून लढण्याकरता विचार सुरू आहे.

उमा भारतींनी निवडणूक लढण्यास नकार दिला असला तरी पक्ष मात्र मन वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उमा भारती भोपाळमधून लढत असल्यास शिवराज सिंह चौहान विदिशामधून लढू शकतात. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्याचं मतदान हे सुरळीत पार पडलं आहे.

छेड काढणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी रस्त्यावरच दिला चोप, VIDEO आला समोर

First published: April 13, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या