राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार कोण? अहमद पटेलांचा भाजपवर निशाणा

राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार कोण? अहमद पटेलांचा भाजपवर निशाणा

'राजीव गांधी यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा होता.'

  • Share this:

नवी दिल्ली 09 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरणी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलंय. राजीव गांधी यांच्यावर आरोप झाल्यानंतर काँग्रेसचे सर्वच नेते मोदींवर तुटून पडलेत. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अहमद पटेल यांनी तर भाजपवर गंभीर आरोप केलाय. राजीव गांधी यांची हत्या ही तत्कालीन व्ही.पी. सिंग सरकारने सुरक्षेत कपात केल्यामुळे झाली आणि त्याला भाजपचा पाठिंबा होता असा आरोप ट्विटरवरून केलाय.

राजीव गांधी यांची 21 मे 1991ला तमिळनाडूतल्या श्रीपेरंबदूर इथं झाली होती. लिट्टेच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बच्या साह्याने केलेल्या स्फोटात त्याची हत्या झाली होती. त्यावेळी केंद्रात व्ही.पी. सिंग यांचं सरकार होतं. त्याच सरकारने आढावा घेऊन  नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती.

व्ही.पी. सिंग यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा होता त्यामुळेच राजीव गांधी यांची हत्या झाली असा आरोप पटेल यांनी केलाय. सर्व सुरक्षा संस्थांनी राजीव गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला होता.

सुरक्षेत कपात करू नये अशी विनंतीही वारंवार करण्यात आली होती. मात्र ती विनंती मान्य करण्यात आली नाही असंही पेटल यांनी म्हटलं आहे. राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा दिल असती तर घटना टळली असती असंही अहमद पटेल यांनी सूचित केलं आहे. शहीद झालेल्या माजी पंतप्रधानांवर दोषारोप करणं हे अतिशय भ्याडपणाचं कृत्य आहे अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

प्रियंका गांधी यांचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेली टीका प्रियंका गांधी यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मोदी सध्या सातत्याने राजीव गांधी यांना टार्गेट करताहेत. पंतप्रधानांच्या या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींसारखा दुबळा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही असा पलटवार त्यांनी केला.

बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरण आणि INS विराटचा राजीव गांधी यांनी सुट्टीसाठी वापर केला असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. या सगळ्या आरोपांनी चिडलेल्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना धारेवर धरलं. प्रियंका म्हणाल्या, नरेंद्र मोदी कायम स्वत:चा मोठेपणा सांगतात. ते स्वत: धाडसी म्हणवून घेतात. मात्र त्यांच्यासारखा दुबळा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही.

राजकीय शक्ती ही फक्त प्रचाराने येत नाही की टीव्हीवर कायम दिसत राहिल्याने येत नाही अशी टीकाही त्यांनी केली. सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे राहिले असून 12 मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात 7 राज्यांमधल्या 59 जागांसाठी मतदान होत आहे. यात दिल्लीतल्या सर्व 7 जागांचाही समावेश आहे.

First published: May 9, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading