आरोप-प्रत्यारोपात रंगलेला लोकसभा निवडणुकीचा 'कटु' प्रचार अखेर संपला

आरोप-प्रत्यारोपात रंगलेला लोकसभा निवडणुकीचा 'कटु' प्रचार अखेर संपला

आरोप-प्रत्यारोप, शिव्यांचा मनसोक्त वापराने हा प्रचार चांगलाच गाजला. त्यामुळे प्रचाराची पातळी खालावल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 मे : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकांचा प्रचार शुक्रवारी 17 मे रोजी अखेर संपला. या निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. यातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान 19 मेला होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी असून नवं सरकार कुणाचं असेल ते स्पष्ट होणार आहे. आरोप-प्रत्यारोप, शिव्यांचा मनसोक्त वापराने हा प्रचार चांगलाच गाजला. त्यामुळे प्रचाराची पातळी खालावल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. आता प्रचाराचा धुराळा थंडावला असून 23 मे नंतरची व्युव्हरचना आखण्यात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केलं आहे.11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. तर 19 मे ला शेवटच्या सातव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. बंगालमध्ये मात्र भाजप आणि तृणमूलच्या भांडणात निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागलं. आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेत प्रचार एक दिवसांनी कमी केला.या प्रचारात वाचाळवीरांनी आपल्या वक्तव्यांनी प्रचाराची पातळी खाली आणली. साध्वी प्रज्ञासिंग, योगी आदित्यनाथ, आझम खान, नवज्योतसिंग सिद्धू, मणिशंकर अय्यार, सॅम पित्रोदा, मायावती, यांच्या वक्तव्यांनी वाद निर्माण झालेत. यातल्या अनेक नेत्यांवर निवडणूक आयोगाने प्रचाराची बंदीही घातली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या झंझावती दौऱ्यात 142 प्रचारसभा तर 4 रोड शो केले अशी माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिली.बालाकोटच्या हल्ल्यानंतर प्रचाराची दिशा बदलल्याचं मत व्यक्त केलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला. देश सुरक्षीत नेत्याच्या हातात सोपवा असं आवाहन त्यांनी केलं. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा उपस्थित करून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी, लोकशाहीवरचं आक्रमण अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या