News18 Lokmat

नेते मस्त, जनता त्रस्त; ग्रामीण भारताचं हे आहे विदारक वास्तव

निवडणुका येतात, जातात आश्वासनं दिली जातात. मात्र पोखरेलेल्या जमीनीवर वसलेलं हे शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 08:47 PM IST

नेते मस्त, जनता त्रस्त; ग्रामीण भारताचं हे आहे विदारक वास्तव

झरिया (झारखंड)19 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेत. त्यात देशाचा कायापालट करू अशी आश्वासनं देण्यात आली आहे. गेली कित्येक दशकं सर्वच राजकीय पक्ष नवा भारत घडविण्याचं आश्वासन देत आहेत. मात्र जो बदल घडायला पाहिजे तो बदल घडवला जात नाही हे वास्तव आहे पुन्हा एकदा पुढे आलं 'न्यूज18 लोकम'च्या 'भैयाजी कहिन' या लोकप्रिय कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात लोकांची वेदना मांडली आहे. लोकांनी सांगितलं फक्त नेतेच मस्त आहेत, जनता मात्र त्रस्त आहे.या कार्यक्रमाचे सूत्रधार प्रतिक त्रिवेदी देशभर जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधतात आणि तिथलं वास्तव दाखवतात. आजच्या कार्यक्रमात त्यांनी झारखंडमधल्या झरिया कोळसा खाणीत वसलेल्या शहराचा वेध घेतला आणि वास्तव सांगितलं.

झरिया हे झारखंडमधलं छोटसं शहर. देशातल्या अतिशय चांगल्या क्षमतेचा कोळसा येथून मिळतो. गेल्या 100 वर्षांपासून  इथे कोळशाच्या खाणी आहेत. हजारो कोटींचा कोळसा इथून बाहेर जातो. मात्र हे शहर भकास होत आहे.

Loading...कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या या शहरात पाणी, रस्ते, रोजगार अशा सुविधांचा अभाव आहे. लोकांना साध्या सुविधांसाठी वणवण करावी लागते. इथल्या लोकप्रतिनिधींना लोकाशी काहीही देणं घेणं नाही अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केलाय.

झरियाच्या चारही बाजूंना कोळशाच्या खाणी आहेत. जमीनीतून कोळसा उपसला जातोय. त्यामुळे झरियाच्या खालची जमीन पोखरली गेलीय. प्रचंड प्रदुषण आणि उष्णता या भागात आहे. प्रदुषणामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. टी.बी., श्वसनाचे विकार आणि दुषीत पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासलं आहे.या भागात चांगल्या दर्जाचा कोळस असल्याने खाण सम्राट झरिया या शहराचं स्थलांतर करण्याच्या मागे आहेत. इथे कितीही अडचणी असल्या तरी आपलं घर दार सोडून दुसरीकडे जायची नागरिकांची इच्छा नाही. खाण मालक पर्यावरणाच्या कुठल्याही नियमांचं पालन करत नाहीत त्यामुळे नागरिकांचं आयुष्यच धोक्यात आलंय.लोक इथे येतात, वास्तव दाखवतात मात्र पुढे काहीही होत नाही. उलट काही दाखवून आमच्या पोटावर पाय येईल असं काही करु नका अशी एका मजूर महिलनं केलेली विनंती तिथलं वास्तव सांगणारी आहे.सरकार या प्रश्नांकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय. निवडणुका येतात, जातात आश्वासनं दिली जातात. मात्र पोखरेलेल्या जमीनीवर वसलेलं हे शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...