23 मे रोजी NDAला बहुमत मिळेल – बाबा रामदेव

23 मे रोजी NDAला बहुमत मिळेल – बाबा रामदेव

बाबा रामदेव यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे.

  • Share this:

हरिद्वार, 17 मे : योगगुरू बाबा रामदेव यांनी लोकसभा निवडणूक 2019मध्ये NDAला पूर्ण बहुमत मिळेल. NDAचं सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. माझ्या भविष्यवाणीनं 23 मे रोजी देशातील काही राजकारण्यांचं स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. गुरूवारी हरिद्वार येथील कार्यक्रमात बोलत असताना बाबा रामदेव यांनी सरकार NDAचं बनेल असा विश्वास व्यक्त केला. देशाला मजबूत आणि स्थिर सरकार मिळेल अशी आशा देखील यावेळी बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. यावेळी बाबा रामदेव यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं.

'या' राज्यांना बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

ममतांवर टीका

पश्चिम बंगालमध्ये रोड शो दरम्यान झालेली हिंसा म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राजकारणात हिंसेला कोणतंही स्थान नाही. ममता बॅनर्जी घाबरली आहे. अशा शब्दात बाबा रामदेव यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र टाकलं.

कमल हसनला लक्ष्य

यावेळी बोलताना बाबा रामदेव यांनी अभिनेता कमल हसनवर देखील टीकास्त्र डागलं. कमल हसन चांगले अभिनेता असतील पण, चांगले नेता ते होऊ शकत नाहीत असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. त्यांची नियत खराब असून DNAमध्ये देखील काहीतरी खराबी असल्याची टीका बाबा रामदेव यांनी केली.

2014मध्ये बाबा रामदेव यांनी भाजपचा प्रचार केला होता. पण, 2019मध्ये मात्र बाबा रामदेव प्रचारापासून लांब आहेत. यापूर्वी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानावरून भाजपच्या डोकेदुखीमध्ये वाढ झालेली आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळाचं भीषण वास्तव, शेतकरी हवालदिल

First published: May 17, 2019, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading