नवी दिल्ली, 29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत सध्या आरोप – प्रत्यारोपांची राळ उठली आहे. आपच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गौतम गंभीर यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप केला होता. त्यावरून गौतम गंभीरवर आता काय कारवाई करणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. हे सारं प्रकरण ताजं असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे पत्नीकडे देखील दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेता हरिश खुराना यांनी सुनिता केजरीवाल यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप करत तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीमध्ये सुनीता केजरीवाल यांच्याकडे गाजियाबादमधील साहिबाबाद येथून तर दुसरं मतदान ओळखपत्र दिल्लीतील चांदनी चौकातून असल्याचा आरोप भाजप नेता हरिश खुराना यांनी केला आहे.
Delhi: BJP leader Harish Khurana(in file pic) has filed complaint against Sunita Kejriwal ,wife of Delhi CM Arvind Kejriwal in Tis Hazari Court. Complainant has alleged that Sunita Kejriwal has 2 voter IDs, one from Sahibabad(Ghaziabad) and one from Civil Lines (Chandni Chowk). pic.twitter.com/J28As5spq4
आप उमेदवार आतिशी यांच्यानुसार गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत. एक मतदान ओळखपत्र हे राजेंद्र नगरमधील आहे. तर, दुसरं मतदान ओळखपत्र हे करोल बागमधील आहे. याप्रमाणे दोन मतदान ओळखपत्र ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे.
जर एका व्यक्तिकडे दोन मतदार ओळखपत्र असल्यास निवडणूक आयोग सदर व्यक्तिला नोटीस पाठवू शकते. शिवाय, एका ठिकाणाहून सदर व्यक्तिला त्याचं नाव कमी करण्यास सांगितलं जातं. तसंच दिलेल्या कालावधीमध्ये सदर व्यक्तिनं नाव न हटवल्यास त्याच्याविरोधात पोलिस कारवाई करण्यात येते.
SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...