'मोदीच माझी हत्या करतील', मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे खळबळ!

'मोदीच माझी हत्या करतील', मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे खळबळ!

या आरोपामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे: नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे. केजरीवाल यांनी भाजपचे नेते विजय गोयल यांना सोशल मीडियावर उत्तर देताना चक्क मोदींना आपली हत्या करायची आहे असा आरोप केला. केजरीवालांच्या या आरोपामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

माझा खासगी सुरक्षा अधिकारी (PSO) नव्हे तर मोदीनाच माझा खून करायचा आहे. शनिवारी केजरीवाल यांनी आरोप केला होता की ज्या प्रमाणे इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केली होती त्याच पद्धतीने माझी देखील हत्या होऊ शकते. भाजप माझ्या जीवावर उठली आहे आणि एक दिवस माझा खून करतील. पंजाबमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी हा आरोप केला होता. भाजप इंदिरा गांधींप्रमाणे माझ्या पीएसओकडून हत्या करेल. माझे स्वत:चे सुरक्षा अधिकारी भाजपला रिपोर्ट करत असतात.

केजरीवाल यांनी केलेल्या या आरोपानंतर गोयल यांनी ट्विटवरून त्यांच्यावर निशाना साधला होता. तुम्ही असा पद्धतीने स्वत:च्या पीएसओवर शंका व्यक्त करणे चुकीचे आहे. तुम्हाला जो पीएसओ हवा आहे तो घ्या. यासंदर्भात माझी काही मदत लागली तर सांगा. आम्ही तुमच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो, असे गोयल म्हणाले होते.गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना केजरीवला यांनी 'विजय जी, मेरी हत्या मेरा PSO नहीं, मोदी जी करवाना चाहते हैं', असे म्हणत आरोप केला होता.

या सर्वा आरोपाआधी केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षे संदर्भात एक ट्विट केले होते. राजधानीत एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झाली होती. त्यानंतर सोमवारी केजरीवाल यांनी पोलीस अधिकारीच सुरक्षित नसेल तर दिल्लीकरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल केला होता.

VIDEO : शरद पवारांनी मागितली 'अल्लाह ताला से दुआ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 08:23 AM IST

ताज्या बातम्या