नवी दिल्ली, 04 मे : देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारामध्ये देखील सर्व पक्ष आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील लोकसभेच्या निकालाकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वच पक्षांनी तगडे उमेदवार रिंगणात उतरवल्यानं दिल्लीच्या राजकीय आखाड्यात रंगत आली आहे.
मनोज तिवारी हे भाजपच्या तिकीटावर उत्तर पूर्व दिल्लीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना आपच्या दिलीप पांडे यांनी आव्हान दिलं आहे. पांडे यांच्या प्रचारादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनोज तिवारींवर टीका केली.
#WATCH Delhi CM Arvind Kejriwal: Manoj Tiwari naachta bahaut acha hai, Pandey ji (AAP's North-East Delhi candidate Dilip Pandey) ko naachna nahi aata, kaam karna aata hai, is baar kaam karne wale ko vote dena, naachne wale ko vote mat dena. (03/05/2019) pic.twitter.com/a3EuxyNytP
मनोज तवारी चांगले नाचतात. पांडे यांना नाचता येत नाही. त्यांना काम करता येतं. यावेळी तुम्ही नाचणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्यांना मत द्या असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
Manoj Tiwari on Delhi CM Arvind Kejriwal's remark 'Manoj Tiwari naachta bahaut acha hai,is baar kaam karne wale ko vote dena,naachne wale ko vote mat dena': By abusing me he has directly insulted ppl of 'purvanchal' & the same ppl will now show him what are the consequences of it pic.twitter.com/J5LZmJWw8U