नवी दिल्ली, 10 एप्रिल : जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर शांततेच्या चर्चेसाठी फायद्याचं ठरू शकतं असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं. त्यावरून आता आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदींना का विजयी करू इच्छितो? नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानमध्ये काय संबंध आहे? नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये फटाके फुटणार हे भारतातील जनतेनं लक्षात ठेवावं, असं केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तान आणि दहशतवाद हा मुद्दा देखील गाजतोय.
पाकिस्तान मोदी जी को क्यों जिताना चाहता है? मोदी जी देश को बतायें कि पाकिस्तान के साथ उनके कितने गहरे रिश्ते हैं?
सभी भारतवासी जान लें कि अगर मोदी जी जीते तो पाकिस्तान में पटाखे फूटेंगे। https://t.co/nWtsOFSMVl
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोठं विधान केलं आहे. इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर शांततेच्या चर्चेसाठी फायद्याचं ठरू शकतं. भारतात जर सत्ताबदल झाला तर येणारं सरकार हे पाकिस्तानसोबत समझोता करण्यापासून मागे हटू शकते.
भाजप जिंकल्यास काश्मीरमध्ये तडजोडीत काहीतरी होईल असं मत इम्रान खान यांनी व्यक्त केलं. शांततेसाठी पुढे येण्याच्या दृष्टीने इम्रान खान म्हणाले,की आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करू. यासाठी लष्कराचे पाकिस्तान सरकारला सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
VIDEO: लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : राज्यात 'या' 7 मतदारसंघात होणार मतदान