अरूण जेटलींनी राहुल गांधींच्या डिग्रीवर उपस्थित केले प्रश्न

अरूण जेटलींनी राहुल गांधींच्या डिग्रीवर उपस्थित केले प्रश्न

आता राहुल गांधी यांच्या पदवीबाबत अरूण जेटली यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतील भाजपच्या प्रतिस्पर्धी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवरून सध्या वाद सुरू आहे. 2014मध्ये पदवी प्राप्त असलेल्या स्मृती इराणी यांच्याकडे 2019मध्ये पदवी नसल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काँग्रेसनं देखील त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी M.A केलं नाही मग त्यांची MPhil कशी पूर्ण झाली? असा सवाल जेटली यांनी केला आहे. फेसबुकवर ब्लॉग लिहत त्यांनी हे सवाल केले आहेत. सध्या स्मृती इराणी यांच्या पदवीवरून वाद सुरू असताना आता राहुल गांधी यांच्या पदवीवर देखील जेटली यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.


आणखी काय म्हणाले जेटली?

राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 2004 आणि 2009मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधून MPhil केल्याचं म्हटलं. तर, 2014मध्ये MPhil डेव्हलपमेंट स्टडीजमधून केल्याचं म्हटलं. या साऱ्या प्रकरणावरून आता अरूण जेटली यांनी राहुल गांधी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

India’s Opposition is on a “Rent a Cause” Campaign या आपल्या ब्लॉगमध्ये अरूण जेटली यांनी स्मृती इराणी यांच्या पदवीबद्दल सवाल केले जात आहेत. पण, राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यतेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, त्यांनी काही सवाल देखील केले आहेत.


दिग्विजय सिंह यांना कुणाचं आव्हान? भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांची नावं चर्चेत


स्मृती इराणी पदवीधर नाहीत?

अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी गुरुवारी (11 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानंतर स्मृती इराणी या 'ग्रॅज्युएट' नसल्याचे समोर आले आहे.

2014 मध्ये अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवताना स्मृती इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून 1994 मध्ये बीएपर्यंत शिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी आपण 3 वर्षांचा कोर्स पूर्ण न केल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे.


VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या