S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी शाह घेणार अडवाणी, मुरली मनोहर जोशींची भेट

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची भेट घेणार आहेत.

Updated On: Apr 8, 2019 11:25 AM IST

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी शाह घेणार अडवाणी, मुरली मनोहर जोशींची भेट

नवी दिल्ली, 08 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता भाजप देखील जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे भाजपच्या आजच्या जाहीरनाम्याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहेत. निवडणुकीकरता दोन्ही नेत्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली. त्यामुळे दोन्ही नेते नाराज आहेत. दरम्यान, निर्णय विचारपूर्वक घेतला गेला असून दोन्ही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक आणि तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. 2014मध्ये भाजपनं काळा पैसा, भ्रष्टाचार आणि रोजगाराच्या मुद्यावर भर दिला होता. त्यामुळे यंदाच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या मुद्यांना प्राधान्य दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे.


भाजपच्या सभेत तरुणाने विकासाबद्दल प्रश्न विचारला, पोलिसांनी केली अटककाँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

2 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सादर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात नमूद असलेल्या गोष्टींबाबत बोलतांना ''सत्तेत आल्यानंतर काँग्रेस शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट संसदेत सादर करणार'' असं राहुल गांधी म्हणाले. तसंच ''गरिबांना किमान उत्पन्न देण्याची हमी देण्यात आली आहे. गरिबांच्या खात्यात किमान उत्पन्न 72 हजार रुपये जमा करणार,'' असं आश्वासन राहुल यांनी यावेळी दिलं. तसंच''कर्ज न चुकविणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, नवीन रोजगार सुरू करणाऱ्यांना किमान तीन वर्षापर्यंत रोजगार सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, 6 लाख तरुणांना ग्राम पंचायतमध्ये रोजगार देणार,'' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.


VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close