• VIDEO: ..आणि नातीने नाकारली शहा आजोबांची टोपी

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 03:43 PM IST | Updated On: Mar 30, 2019 03:43 PM IST

    अहमदाबाद, 30 मार्च : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज (30 मार्च) गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी अमित शहा यांनी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी आपल्या नातीला जवळ घेतलं. त्यावेळी तिने पांढरी हॅट घातली होती. शहा आजोबांनी तिची पांढरी हॅट काढून भाजपची टोपी घालण्याचा प्रयत्न केला. पण नातीने ती टोपी घालण्यास नकार दिला आणि परत आपली पांढरी हॅट घातली. आजोबा अमित शहा आणि त्यांच्या नातीमधील हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी