'राजकीय पक्षांनी फक्त मतांसाठी मुस्लिमांचा 'फुटबॉल' केला'

'राजकीय पक्षांनी फक्त मतांसाठी मुस्लिमांचा 'फुटबॉल' केला'

'मोदींना हरविण्यासाठी मुस्लिमांना भीती दाखवली जाते का?'

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : निवडणुका आल्या की त्यात धर्म आणि जातींचा वापर केला जातो. काँग्रेसचे मंत्री आणि नेते नवज्योतसिंह सिद्धू आणि बसपाच्या नेत्या मायावती यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरच न्यूज18 इंडियाची हम तो पुछेंगेमध्ये चर्चा होती  मोदींना हरविण्यासाठी मुस्लिमांना भीती दाखवली जाते का?

निवडणुकीत केवळ मतं मिळविण्यासाठीच काँग्रेसकडून कायम मुस्लिमांना भाजपची भीती दाखवली जाते असं मत भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केलं. काँग्रेसने व्होट बँकेचं राजकारण करुनच आत्तापर्यंत सत्ता मिळवली असा आरोपही त्यांनी  केला.

तर जेवढे प्रश्न नवज्योत सिद्धू यांना केले गेले तेवढेच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले पाहिजे असं मत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधीका खेरा यांनी व्यक्त केलं. योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला असा आरोपही खेरा यांनी व्यक्त केला. आदर्श आचारसंहिता ही भाजपच्या नेत्यांसाठी नाही का असा सवालही त्यांनी केल.

राजकीय पक्षांनी फक्त मतांसाठी मुस्लिमांचा वापर केला, त्याचा सध्या फुटबॉल झाला आहे. सगळे पक्ष त्यांना लाथाडत आहेत. पण मुस्लिम आता शहाणा होतोय. तो शिकतोय त्याला कुणीही भीती दाखवू शकत नाही. तो सजग झालाय असं मत ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रसीदी यांनी व्यक्त केलं. यापुढे आपला राजकीय वापर होणार नाही याची काळजी मुस्लिमांनी घ्यावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

या चर्चात साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीचाही मुद्दा आला. मौलाना रसदी म्हणाले, दहशतवादाला धर्म नसतो. हिंदू दहशतवाद हा प्रयोग कुणा मुसलमानाने केला नाही तर एका हिंदू व्यक्तिनेच तो वापरला होता. प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देणं हे योग्य नाही असंही त म्हणाले. तर साध्वी यांच्या विरुद्ध कोर्टात काहीही सिद्ध झालं नाही असं भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी सांगतलं.

First published: April 17, 2019, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading