निवडणुकीच्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

निवडणुकीच्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या फक्त 'एका क्लिक'वर

  • Share this:

शरद पवार पुतण्याकडून क्लिन बोल्ड; PM मोदींचा घणाघाती आरोप

वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशात कोणाची हवा आहे हे कळते. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली. मोदींनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वर्धा येथून केला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका केली. काय म्हणाले मोदी, ऐका

'पुतण्याने पवारांची विकेट घेतली', मोदींच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे म्हणतात...

'पुतण्याने पवारांची विकेट घेतली' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा इथं झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आमच्या घराबाबतीत मोदींनी केलेला आरोप हस्यास्पद आहे. महत्त्वाचे प्रश्न सोडून पंतप्रधान इतर विषयांवरच बोलत आहेत, हे दुर्दैवी आहे,' असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ऐका सुप्रिया सुळे

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील सभेत फोडला. प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसंच ''जिथे अल्पसंख्यांक मतदार जास्त आहेत तेथे निवडणूक लढवत आहेत,'' असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला. तसंच ''हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसमुळे आला. काँग्रेसमुळे देशातील हिंदू बदनाम झाला. देशातील हिंदूंचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसने केलंय,'' असं मोदी म्हणाले. मोदींचा हल्लाबोल

'50 वर्ष काँग्रेसने एप्रिल फूल बनवलं', मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 मुद्दे

काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. सोमवारी वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. वर्ध्यामध्ये आयोजित या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पाहूयात त्यांच्या भाषणातेल 10 मुद्दे...

VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवेलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

आपल्या वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांनी ''किधर भी नजर नही आ रही है काँग्रेसकी खादी, क्योंकि देशके पंतप्रधान बन गयें हैं नेरंद्र मोदी. वर्धा जिले की बोल रही है दादी, दुबारा बनेंगे पंतप्रधान नरेंद्र मोदी,'' अशी खास कविता मोदींच्या वर्ध्यातील प्रचार सभेत सादर केली. ''देशाचं संविधानं बदललं जात असल्याची अफवा काँग्रसकडून पसरवली जात आहे. पण मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असून, तसं अजीबात होऊ देणार नाही,'' असं आठवले म्हणाले. ऐका आठवलेंची कविता

या 3 स्त्रिया मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात देणार युतीला टक्कर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज आहिर आणि शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात नरेंद्र मोदींनी पहिली प्रचारसभा घेतली. त्याच विदर्भातून 3 स्त्रिया भाजपची वाट बिकट करू शकतात. वाचा कसं रंगणार युद्ध

VIDEO: 'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'

सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ''मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही,'' असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना '' जेवढ्या जागा माझ्या वाट्याला आल्या शिवसेना तेव्हढीच मला सीमीत ठेवायची नाही. विरोधी पक्षात सर्वांनाच पंतप्रधान होण्याची ईच्छा आहे. काँग्रेसमुक्त भारत ही फक्त एक कल्पना आहे. अयोध्या प्रश्नाना गती मिळाली नाही तर मी पुन्ही अयोद्धेला जाईल,'' असंही ते म्हणाले. काय म्हणाले उद्धव ठाकरे

...आणि म्हणून पार्थ यांना पाहताच अजित पवार मेळाव्यातून निघून गेले

मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित रविवारी कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली या कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या मेळाव्यात पार्थ पवार दीड तास उशिराने पोहचले. नेमकं काय झालं वाचा

Analysis : राहुल गांधी वायनाडमधून लढल्यास भाजपला फायदा?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर आता डाव्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. काँग्रेसला उभारी देण्यास दक्षिण भारतानं मोठा हातभार लावला आहे असं इतिहासामध्ये पाहिल्यानंतर दिसून येतं. पण, आता काँग्रेसच्या फायद्याऐवजी राहुल गांधी यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. वाचा ग्राऊंड रिपोर्ट

निवडणुकीत हा आहे भाजपचा सर्वात तरुण उमेदवार, सोशल मीडियावर क्रेझ

लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात येतोय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या प्रचारासोबतच सोशल मीडियावरही प्रचाराचं युद्ध रंगलं आहे. सोशल मीडियावरच्या या चर्चेत जे उमेदवार आघाडीवर आहेत त्यात सर्वात वरच्या स्थानावर आहे तो भाजपचा बंगळुरूमधला 28 वर्षांचा उमेदवार तेजस्वी सूर्या. तेजस्वी हा भाजपचा या निवडणुकीतला सर्वात तरुण चेहेरा समजला जातो. वाचा कोण आहे तेजस्वी सूर्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या